शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोविड संसर्ग रोखण्यासाठी एसटीचे विषाणूरोधक निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

अहमदपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून सर्व उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. खासगी, सार्वजनिक वाहतूकसेवाही अडचणीत आली ...

अहमदपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून सर्व उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. खासगी, सार्वजनिक वाहतूकसेवाही अडचणीत आली आहे. एकमेकांच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होत असल्याने एसटी महामंडळाने निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अहमदपूर आगारात प्रथमच ॲन्टी मायक्रोबायल ट्रिटमेंटमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

कोविडमुळे एसटी महामंडळास मोठा फटका बसला आहे. संसर्गाच्या भीतीने प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक प्रवास करीत नाहीत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. हा संसर्ग कमी व्हावा म्हणून एसटी महामंडळाने ॲन्टी मायक्रोबायल ट्रिटमेंटमार्फत अहमदपूर आगारातील ५५ बसचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशा प्रकारे निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याने सर्व प्रकारचे विषाणू नष्ट होतात, असे कंपनीच्या प्रकल्पाचे संचालक जितेंद्र शर्मा यांनी सांगितले.

विषाणूरोधक कोटिग करून बस निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. या प्रकारामुळे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस नष्ट होतात. त्यामुळे बसेस सुमारे दोन महिने विषाणूमुक्त राहतात, असेही ते म्हणाले.

प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम...

कोरोना विषाणू रोधक कोटिंगमुळे सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस नष्ट होतात. त्यामुळे या बसेस सुमारे दोन महिने विषाणूमुक्त राहातात. तिसऱ्या लाटच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून ही खबरदारी घेत जात आहे. कोरोनापासून प्रवाशांचा बचाव करण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रायोगिक तत्त्वावर अहमदपूर आगारातील ५५ बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक एस.जी. सोनवणे यांनी दिली.