औराद शहाजानीच्या सरपंचपदी आरती भंडारे, महेश भंडारे उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:03+5:302021-02-11T04:21:03+5:30

औराद शहाजानी येथील ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली. यात ७८ उमेदवार रिंगणात होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी माजी ...

Aarti Bhandare as Sarpanch of Aurad Shahjani, Mahesh Bhandare as Deputy Sarpanch | औराद शहाजानीच्या सरपंचपदी आरती भंडारे, महेश भंडारे उपसरपंच

औराद शहाजानीच्या सरपंचपदी आरती भंडारे, महेश भंडारे उपसरपंच

औराद शहाजानी येथील ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली. यात ७८ उमेदवार रिंगणात होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी माजी सरपंच मोहनराव भंडारे यांच्या पॅनेलला १७ पैकी १० जागांवर निवडून दिले. वलांडे पॅनलचे केवळ तीन उमेदवार विजयी झाले हाेते तर भाजपचे माजी सरपंच डॉ. मल्लिकार्जून शंकद यांच्या पॅनलचे दोन उमेदवार आणि आघाडीचा एक उमेदवार तसेच एक अपक्ष विजयी झाला होता. सरपंच पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते.

बुधवारी सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीसाठी अध्यासी अधिकारी एम.झेड. सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली नूतन ग्रामपंचायतीच्या सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. त्यात सरपंच म्हणून आरती बालाजी भंडारे तर उपसरपंच म्हणून महेश मोहनराव भंडारे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिका-यांनी जाहीर केले. त्यांना ग्रामविकास अधिकारी धनाजी धनासुरे, तलाठी व्ही.एस. चव्हाण यांनी सहाय्य केले.

दोन्ही पदांसाठी दोन- दाेन अर्ज...

सरपंचपदासाठी आणि उपसरपंचपदासाठी दोन- दाेन अर्ज दाखल झाल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. त्यात सरपंच पदाच्या आरती भंडारे यांना ११ तर उपसरपंच पदाच्या महेश भंडारे यांनाही प्रत्येकी ११ मते पडली.

Web Title: Aarti Bhandare as Sarpanch of Aurad Shahjani, Mahesh Bhandare as Deputy Sarpanch