दोन दिवसांत ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:15 IST2021-04-29T04:15:06+5:302021-04-29T04:15:06+5:30

अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून कोविड हेल्थ सेंटर सुरु होत ...

A 50-bed hospital with oxygen in two days | दोन दिवसांत ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे हॉस्पिटल

दोन दिवसांत ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे हॉस्पिटल

अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून कोविड हेल्थ सेंटर सुरु होत आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. इमारतीची रंगरंगोटी, ऑक्सिजन पाईपचे काम पूर्ण होत आले आहे. पाणी व्यवस्था, विद्युतीकरण, अग्निशमनचे परीक्षण सुरु आहे. दोन दिवसांत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होतील. महाराष्ट्र दिनी हे सेंटर सुरु होणार आहे.

आ. बाबासाहेब पाटील यांच्या सूचनेवरून हे रुग्णालय कार्यान्वित होत आहे. बुधवारी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, धन्वंतरी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, तलाठी शाम कुलकर्णी यांनी पाहणी केली. ५० खाटांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १ मे पासून सदर रुग्णालय सुरु होणार असल्याचे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: A 50-bed hospital with oxygen in two days