शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जक्कनहट्टी गाव समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: November 7, 2014 23:31 IST

शासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

संजय पाटील - कोवाड -कोवाडपासून केवळ ४ कि.मी. अंतरावर असणारे जक्कनहट्टी (ता. चंदगड) गाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. आजूबाजूच्या गावांना जोडणारा येथील पक्का रस्ता गायबच आहे. शिक्षण, आरोग्य, रेशन, आदी सुविधांसाठी येथील ग्रामस्थांना कित्येक किलो मीटरची पायपीट करावी लागत आहे. शासनासह या गावाकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष असल्याने हे गाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खरंच या गावाचा कायापालट होणार का ? की हे प्रश्न असेच राहणार याची काळजी ग्रामस्थांना आहे.जवळपास ६०० लोकसंख्या असणारे हे गाव मलतवाडीच्या उत्तरेला वसले आहे. गावामध्ये केवळ पिण्याच्या पाण्याची सोय वगळता इतर कोणत्याही सुविधा नाहीत. पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. शासन व शेतकऱ्यांच्या वादात येथील रस्ता अर्धवट पडला आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये येथील विविध प्रश्नांवर आवाज उठवून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र, आश्वासनानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. ग्रामस्थांना बँक व्यवहारासाठी कोवाड किंवा म्हाळेवाडीला जावे लागते. दूरध्वनी केंद्र कोवाड आहे. गाव ग्रामीण भागात असूनही बिल मात्र शहरी येते. विकास सेवा सोसायटीच्या व्यवहारासाठी मलतवाडीला जावे लागते. हे गाव कोवाडकडून जवळ असूनही आरोग्य केंद्र मात्र माणगावशी संलग्नित आहे.तलाठी कामासाठी कोवाड, माध्यमिक शिक्षणासाठी मलतवाडी, निट्टूर, सांबरे येथे जावे लागते. ग्रामपंचायत घुल्लेवाडी असल्याने विविध दाखल्यांसाठी घुल्लेवाडीला जावे लागते. एकाच गावातील लोकांना आपल्या कामासाठी सहा गावांशी दररोज संपर्क ठेवावा लागतो ते ही चालतच. कारण येथे रस्ताच नसल्याने कोणतेही वडाप किंवा एस.टी. बस जात नाही. एखाद्या अत्यवस्थ रूग्णाला हॉस्पिटलला न्यायचे असेल, तर ‘मरण बरे, पण प्रवास नको’, अशी अवस्था रूग्णांची व नातेवाइकांची होते. या सर्व प्रकाराने येथील ग्रामस्थ वैतागला आहे.स्वातंत्र्याच्या साठीनंतरही आपण पारतंत्र्यात आहोत की काय, असे आम्हाला वाटत आहे. विविध राजकीय पक्षांच्या पाया पडूनही गावाचा विकास खुंटला आहे. विविध सोयी नसल्याने येथील मुले शिक्षण अर्धवट सोडून शेतीकडे वळत आहेत. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून जक्कनहट्टी गावाला नवसंजीवनी द्यावी.- आनंदा बाळेकुंद्री, जक्कनहट्टी रहिवासी