Kolhapur Crime: शटरचे हँडल डोक्यात मारून तरुणाचा खून, कोडोली येथे भांडणातून घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 15:48 IST2026-05-11T15:47:50+5:302026-05-11T15:48:29+5:30

आरोपीला अटक

Youth murdered by hitting him in the head with a shutter handle during a fight in kodoli Kolhapur | Kolhapur Crime: शटरचे हँडल डोक्यात मारून तरुणाचा खून, कोडोली येथे भांडणातून घडली घटना

Kolhapur Crime: शटरचे हँडल डोक्यात मारून तरुणाचा खून, कोडोली येथे भांडणातून घडली घटना

कोडोली : येथे रहदारीच्या मुख्य मार्गावर दोघांत झालेल्या भांडणात डोक्यात शटरचे हँडल मारल्याने अभिजीत प्रकाश जाधव (वय ४२, रा.शामूनाना माळ, कोडोली) या तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी संदीप पाटील (रा.सध्या कोडोली, मूळगाव थेरगाव ता.शाहूवाडी) याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संदीप पाटील याचे कोडोली येथील सर्वोदय चौक मार्गावर कापड दुकान आहे. या दुकानाजवळ अभिजीत व संदीप यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात पाटील याने दुकानात शटर ओढण्यासाठी वापरले जाणारे हँडल जाधव यांच्या डोक्यात मारले.

डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने मारहाण झाल्याची तक्रार देण्यासाठी जाधव हे कोडोली पोलिस ठाण्यात गेले. यावेळी त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आले; परंतु उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

जाधव यांचे कोडोली येथे हॉटेल आहे. ते आई, पत्नी यांच्या मदतीने हॉटेल चालवित होते. हा वाद अर्थिक व्यवहारातून झाला असल्याची नागरिकांत चर्चा आहे. जाधव यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी शाहूवाडी विभागाचे पोलिस उपाधीक्षक अप्पासाहेब पवार, कोडोली पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी भेट देऊन माहिती घेतली.

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार 

दरम्यान, आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाइकांनी सीपीआरमध्ये घेतली होती. मात्र, आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळतात, नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title : कोल्हापुर अपराध: दुकान के शटर पर झगड़े में युवक की हत्या

Web Summary : कोल्हापुर में, दुकान के शटर से झगड़े के बाद एक व्यक्ति की मौत हो गई। पुलिस ने संदिग्ध को गिरफ्तार कर लिया। घटना वित्तीय विवाद से उपजी। रिश्तेदारों ने शुरू में शव लेने से इनकार कर दिया, लेकिन गिरफ्तारी के बाद मान गए।

Web Title : Kolhapur Crime: Man Killed After Fight Over Shop Shutter

Web Summary : In Kolhapur, a man died after being hit with a shop shutter handle during a fight. Police arrested the suspect. The incident stemmed from a financial dispute. Relatives initially refused to claim the body, but relented after the arrest.