कुरुंदवाड येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST2021-04-03T04:22:10+5:302021-04-03T04:22:10+5:30

रंगपंचमी खेळून अंघोळीस गेलेला अकिब यासिन बागवान (वय २४, रा. ढेपणपूर मशिदीजवळ कुरुंदवाड) याचा विहिरीत पडून मृत्यू ...

Young man drowns in well at Kurundwad | कुरुंदवाड येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

कुरुंदवाड येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

रंगपंचमी खेळून अंघोळीस गेलेला अकिब यासिन बागवान (वय २४, रा. ढेपणपूर मशिदीजवळ कुरुंदवाड) याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास कुरुंदवाड-तेरवाड रस्त्यावरील गायकवाड पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मालगावे विहिरीत ही घटना घडली. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिसांत झाली आहे. रंगपंचमी खेळून दुपारी एकच्या सुमारास अकिब नातेवाईकांसोबत विहिरीत पोहावयास गेला होता. यावेळी पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या आकस्मिक अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अकिबच्या बहिणीचे रविवारी लग्न असल्याने शुक्रवारी हळदीचा आणि मित्रपरिवारासाठी दुपारी जेवणाचा कार्यक्रम होता. अकिब दुपारी रंगपंचमी खेळून नातेवाईकांसोबत विहिरीला अंघोळीसाठी गेला होता; मात्र विहिरीत उडी मारली. त्यानंतर वर आलाच नाही. स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी विहिरीत उडी मारून मृतदेह बाहेर काढला.

यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

फोटो - मृत - ०२ अकिब बागवान

Web Title: Young man drowns in well at Kurundwad