शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांच्या लढ्याला यश

By admin | Updated: August 1, 2014 23:23 IST

कोट्यवधीचा लाभ : जिल्ह्यातील ४३५ प्रस्तावही मंजूर

म्हाकवे : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, एका मुलीवर अपत्य शस्त्रक्रिया, महिला कामगारांच्या बाळंतपणाचा खर्च आदी ११०० हून अधिक लाभर्थ्यांचे प्रस्ताव शासनाकडे दिले होते. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ‘सीट्र’च्या नेतृत्त्वाखाली राज्य बांधकाम संघटनेने याबाबत आंदोलनाचा मार्ग अवलंबिला. या आंदोलनाला यश आले असून जिल्ह्यातील ४३५ लाभार्थ्यांना ३५ लाख ८२ हजार २०० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे व सचिव शिवाजी मगदूम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बांधकाम कामगारांच्या आरोग्यासह शिष्यवृत्ती देण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे. परंतु, अधिकारी या लाभार्थ्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता. यावेळी कामगार आयुक्त सुहास कदम व मंत्री मुश्रीफ यांनी कामगारांच्या प्रस्तावाकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ११०० प्रस्तावापैकी पात्र ४३५ कामगारांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर आंदोलनापूर्वी शासन पातळीवरून जिल्हातील ११६ जणांचे प्रस्ताव केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या या आंदोलनाचे पडसाद कामगार मंत्रालयापर्यंत उमटले. त्यामुळे पुणे विभागातील ५५६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ४३५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. याबाबत जिल्ह्यातील बांधकाम कामगारात उत्साहाचे वातावरण आहे.संघर्षातून झाला उत्कर्षबांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांच्या सेवा-सुविधेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून होता. मात्र, कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळत नव्हता. त्यामुळे ‘सीट्र’च्या नेतृत्त्वाखाली राज्यातील कामगार एका झेंड्याखाली येऊन शासन दरबारी आंदोलने, मोर्चे काढून जाग आणली. त्याचे फलित म्हणून राज्यातील नोंदीत १ लाख ८३ हजार कामगारांना साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी ३ हजार प्रमाणे ५४ कोटी ९० लाख रुपये मिळाले. यामध्ये जिल्ह्यातील ३० हजार कामगारांना ९ कोटी रुपयांचा सर्वाधिक लाभ झाला. त्यामुळे संघर्षातून कामगारांचा उत्कर्ष होत असल्याची भावनाही शिवाजी मगदूम-सिद्धनेर्लीकर यांनी व्यक्त केली.