शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चिचडोह प्रकल्पाचे काम प्रगतीवर

By admin | Updated: June 18, 2017 01:24 IST

जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्यांपैकी चिचडोह बंधारा, कोटगल उपसा सिंचन,

वर्षभरात काम पूर्ण होणार : माजी आमदारांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्यांपैकी चिचडोह बंधारा, कोटगल उपसा सिंचन, हल्दीपुराणी उपसा सिंचन या प्रकल्पांना काँग्रेसच्या काळात प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह प्रकल्पाला तत्कालीन सरकारने १५२ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. सदर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून हे काम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिचडोह प्रकल्पाच्या कामाची पाहणी नुकतीच केली. यावेळी काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष निशांत नैताम, विनोद खोबे, वैभव भिवापुरे, प्रमोद भगत, विजय शातलवार तसेच काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसच्या तत्कालीन राज्य सरकारने हल्दीपुराणी उपसा सिंचन योजनेस ४५ कोटी व कोटगल उपसा सिंचन प्रकल्पाला ५५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला, असे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे. विद्यमान भाजपप्रणित राज्य सरकारने कोटगल व हल्दीपुराणीचा सिंचन प्रकल्पास पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. भाजप सरकारने व लोकप्रतिनिधींनी या सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यास हे प्रकल्प पूर्ण करण्यास पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागेल. तसेच या प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे. ७८ टक्क्यांपैकी अर्धा टक्के वनजमीन सरकारने प्रकल्पांना दिल्यास हे प्रकल्प मार्गी लागू शकतात. मात्र यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे.