शिवाजीराव पाटील यांच्यावर शंभर कोटींचा दावा दाखल करणार: हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:41 IST2026-05-07T12:36:54+5:302026-05-07T12:41:32+5:30

आठ-दहा दिवसांत आरोपांचे पुरावे देण्याचे केले आवाहन

Will file a lawsuit against Shivajirao Patil for Rs 100 crore said Hasan Mushrif | शिवाजीराव पाटील यांच्यावर शंभर कोटींचा दावा दाखल करणार: हसन मुश्रीफ

शिवाजीराव पाटील यांच्यावर शंभर कोटींचा दावा दाखल करणार: हसन मुश्रीफ

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: नोटाबंदीच्या काळात हसन मुश्रीफ यांनी स्वतःकडील कोट्यवधी रुपये जिल्हा बँकेत आणून बदलून घेतल्याने बँक अडचणीत आल्याचा बदनामीकारक आरोप आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंगळवारी केला होता. त्यांनी आठ-दहा दिवसांत याबाबतचे पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा बदनामीचा फौजदारीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी पत्रकातून दिला.

मंत्री मुश्रीफ पत्रकात म्हणतात, आमदार पाटील हे गेल्या पाच वर्षात 'गोकुळ' बाबत काहीही बोलले नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील दारुण पराभवानंतरच त्यांना हा साक्षात्कार झालेला दिसतो. त्यातूनच ते माझ्यावर आरोप करीत आहेत. गेल्या ३५-४० वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीमध्ये माझ्या वैयक्तिक प्रतिमेला फार जपत आलो आहे. मी कुठलीही गोष्ट मान्य करीन परंतु माझी प्रतिमा, माझा स्वाभिमान, माझ्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन कधीही बदलता कामा नये, यासाठी मी पडेल ती किंमत देऊन कायदेशीर लढाई लढत असतो. आजपर्यंत ज्या-ज्या वेळी माझी व्यक्तिश: बदनामी केली, त्यांच्याविरोधात मी १०० कोटी रुपयांचे फौजदारी बदनामीकारक दावे न्यायालयात दाखल केलेले आहेत. माझ्या वतीने दाखल होत असलेला हा दहावा दावा आहे.

हे वक्तव्य म्हणजे साखर कारखानदारांचा अपमान

जिल्हा बँकेतून साखर कारखान्यांसह इतर संस्थांना अर्थपुरवठा होतो म्हणून माझ्याविरोधात जाण्यास आमदार घाबरतात, असे आमदार पाटील म्हणतात. हे त्यांचे वक्तव्य म्हणजे आमदारांसह बँकेच्या संचालकांचा व कारखानदारांचा अपमान असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

हे करून दाखवाच...!

आमदार पाटील हे गोकुळ दूध संघ आणि के. डी. सी. सी बँकेत चौकशी लावतो, हे करतो आणि ते करतो, असा नुसत्या बाष्कळ गप्पा मारत आहेत. त्यांनी ते एकदा करूनच दाखवावेच. कारण, आम्ही संस्था कशा स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख चालविलेल्या आहेत, हे सगळ्या सभासदाना आणि जनतेलाही माहीत असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title : हसन मुश्रीफ शिवाजीराव पाटिल पर करेंगे 100 करोड़ का मानहानि का दावा

Web Summary : मंत्री हसन मुश्रीफ ने नोटबंदी के दौरान मनी लॉन्ड्रिंग के आरोपों पर विधायक शिवाजीराव पाटिल पर ₹100 करोड़ का मुकदमा करने की धमकी दी। मुश्रीफ आरोपों का खंडन करते हुए अपनी छवि को साफ बताते हैं और पाटिल को अपने दावे साबित करने की चुनौती देते हैं। उन्होंने पाटिल की टिप्पणी को चीनी मिल मालिकों का अपमान बताया।

Web Title : Hasan Mushrif to File 100 Crore Defamation Suit Against Shivajirao Patil

Web Summary : Minister Hasan Mushrif threatens to sue MLA Shivajirao Patil for ₹100 crore over allegations of money laundering during demonetization. Mushrif denies the charges, asserting his clean image and challenges Patil to prove his claims. He also criticizes Patil's remarks as insulting to sugar factory owners.