सर्वसमावेशक पॅनलसोबत राहणार - श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:24+5:302021-04-04T04:23:24+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सर्वसमावेशक जे पॅनल असेल त्यांच्यासोबत आम्ही राहू, अशी माहिती जनता दलाचे ज्येष्ठ नेते ॲड. श्रीपतराव ...

Will be with the comprehensive panel - Shripatrao Shinde | सर्वसमावेशक पॅनलसोबत राहणार - श्रीपतराव शिंदे

सर्वसमावेशक पॅनलसोबत राहणार - श्रीपतराव शिंदे

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सर्वसमावेशक जे पॅनल असेल त्यांच्यासोबत आम्ही राहू, अशी माहिती जनता दलाचे ज्येष्ठ नेते ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी दिली. मीनाक्षी सोनाळकर या एकट्या ‘गोकुळ’मध्ये विजयी झाल्या, त्यामुळे जनता दलाचा हा इतिहास कोणी विसरू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

‘गोकुळ’मध्ये दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या व गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती काेरी यांनीही अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्यांच्या गटाची भूमिका जाहीर झालेली नाही, याबाबत ॲड. शिंदे यांना विचारले असता, मोठे पक्ष छोट्या पक्षांचा केवळ वापर करून घेतात. एकूण परिस्थिती पाहता सर्वसमावेश पॅनलच्या सोबत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. भूमिका जाहीर करायला अजून वेळ आहे. मात्र, आम्हाला कोणी गृहीतही धरू नये. जनता दलाच्या मीनाक्षी सोनाळकर या एकट्याच निवडून आल्या होत्या, त्यामुळे हेही कोणी विसरू नये, असे ॲड. शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Will be with the comprehensive panel - Shripatrao Shinde