शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

धमकीचा फोन कोणाचा? पोलीस चक्रावले, सायबर विभागाला नंबर सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 16:11 IST

कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी; यासाठी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलवर आलेल्या दोन नंबरांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाही.

ठळक मुद्देधमकीचा फोन कोणाचा? पोलीस चक्रावले, सायबर विभागाला नंबर सापडेनाघाटगे धमकी प्रकरणाचा गुंता वाढला

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी; यासाठी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलवर आलेल्या दोन नंबरांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाही.

सायबर विभागाचे तज्ज्ञ कसून शोध घेत असून, त्यांना घाटगे यांच्या मोबाईलवरील इनकमिंग डाटा उपलब्ध झालेला नाही. नंबर सापडत नसल्याने धमकी फोन प्रकरणाचा गुंता वाढला आहे. धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस कसून तपास करीत आहेत.सुहासिनीदेवी घाटगे यांच्या दोन मोबाईल नंबरवर धमकीचे फोन शुक्रवारी (दि. ४) आणि शनिवारी (दि. ५) आले होते. त्याचे वृत्त प्रसिद्ध होताच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. धमकी कोणी दिली याची उत्सूकता संपूर्ण जिल्ह्याला लागून राहिली आहे. घाटगे यांच्या मोबाईलवर आलेल्या फोनबाबत पोलिसांनी संबंधित कंपनीकडे इनकमिंग नंबरची माहिती मागितली आहे.

या तपासासाठी सायबरतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे; पण त्याबाबत अद्याप काहीही हाती लागलेले नाही. धमकी आलेला नंबर अद्याप पोलिसांना मिळाला नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. या प्रकरणाला राजकीय वास आहे काय, याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कागलकडे गुरुवारी (दि. १0) गेले होते. त्यांनी माहिती घेतली असता, हाती काहीच लागले नाही.

सुहासिनीदेवी घाटगे यांना आलेल्या धमकीचा तपास सुरू आहे. नंबर मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल. अद्याप सायबर विभागाकडून नंबर प्राप्त झालेला नाही. अद्याप एकही धागा हाती लागलेला नाही. नंबर मिळताच आरोपी स्पष्ट होईल, तो मिळविण्यासाठी सायबरसह शाहूपुरी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.कुंदन गाडे, सहायक निरीक्षक, तपास अधिकारी 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर