शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातील घरांची पायाभरणी कधी? : अद्याप सरकारकडून निधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:19 IST

अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव पाठवून दोन महिने उलटले

प्रवीण देसाईकोल्हापूर : आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टीने आलेल्या महापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासन व केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल सप्टेंबर महिन्यातच पाठविला असून, अद्याप यातील एक रुपयाही नुकसानग्रस्ताला मिळालेला नाही. त्यामुळे महापुरातील नुकसानग्रस्तांच्या घरांच्या पायाभरणी कधी होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात या अहवालाला अंतिम स्वरूप देऊन तो पुन्हा शासनाला पाठविला. त्यानुसार पूर्णत: घरे पडलेल्यांसाठी प्रत्येकी ९५ हजार १०० रुपयांप्रमाणे ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे; तर पूर्णत: पडलेल्या ६४ झोपड्यांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे तीन लाख ८४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

अंशता पडलेल्या पक्क्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक कोटी २६ लाख रुपये व अंशत: पडलेल्या कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या राष्टÑीय आपत्ती निवारण निधीतून हा निधी जिल्हा प्रशासनाने मागितला आहे. यानंतर अपेक्षित नुकसानीची मदत येणे अपेक्षित होते.; परंतु यातील एक छदामही पुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना मिळालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या घरांची पायाभरणी होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.जिल्ह्यातील १६ हजार घरांचे पूर्णत: नुकसानमहापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये पूर्णत: पडलेल्या घरांची संख्या १६ हजार ६४२ इतकी असून त्याकरिता ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. एकूण ६४ झोपड्या जमीनदोस्त झाल्या असून, त्यासाठी ३ लाख ८४ हजार रुपये, अंशत: पडलेल्या घरांची संख्या २११४ इतकी असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख ८४ हजार, अंशत: पडलेल्या २९७५८ कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे.

महापुरातील पाण्याने पडलेल्या घरांसंदर्भात अंतिम अहवाल गतमहिन्यात राज्य शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये सुमारे ४१ हजार घरांच्या नुकसानीसाठी संबंधितांना ११० कोटी ८५ लाख ७० हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच ही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.- भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी 

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर