शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे जातीचे दाखले तत्काळ बदलून देऊ

By admin | Updated: November 11, 2014 00:17 IST

करवीर प्रांताधिकारी : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आंदोलनाला यश

कोल्हापूर : करवीर प्रांत कार्यालयाकडून मराठा जातीचे दाखले देताना ‘मराठा (१४९)’ असा उल्लेख होता. जातीसमोर कंसात असा उल्लेख आल्याने जातपडताळणी कार्यालयाकडून हे दाखले जात वैधता प्रमाणपत्र करताना नाकारण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याकरिता मराठा महासंघाने आज, सोमवारी करवीर प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांच्या मागण्या मान्य करत या कार्यालयाकडून दिलेले दाखले परत घेऊन नवीन दाखले दिले जातील, असे आश्वासन पाटील यांनी महासंघाच्या आंदोलकांना दिले. राज्यात मराठा आरक्षण निर्णय झाल्यानंतर करवीर प्रांत कार्यालयामार्फत मराठा समाजाचे दाखले देताना जातीसमोर कंसात (१४९) असा उल्लेख करण्यात आला होता. हा उल्लेख असल्याने जातपडताळणी कार्यालयाने चुकीचा दाखला म्हणून सुमारे चारशेहून अधिक मराठा जातीचे दाखले वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे अनेकांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. त्याचा विचार करून मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रांताधिकारी पाटील यांची भेट घेऊन आम्हाला यासंदर्भात आंदोलन करण्यास भाग पाडू नका. आमचे दाखले त्वरीत बदलून द्या, अशी मागणी केली. त्यावर प्रांताधिकारी पाटील यांनी असे दाखले स्पॅनको या महा ई-सेवाअंतर्गत ‘महासेतू’साठी नेमलेल्या कंपनीकडून चुकीने वाटले गेले आहेत. त्यासाठी आॅनलाईन पद्धतीने या दाखल्यांमध्ये बदल करण्यासाठी प्रक्रिया चालू केली आहे. त्यामुळे वाटलेले जातीचे दाखले मूळ प्रतीसह परत करावेत. त्यानंतर चार ते पाच दिवसांत नवीन मराठा जातीचे दाखल देवू, असे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे आंदोलकांना अचंबित होण्याची वेळ आली. प्रथमच आंदोलनासाठी गेल्यानंतर तत्काळ अधिकाऱ्याने त्यावर निर्णय घ्यावा आणि ते काम हातावेगळे करावे, असा अनुभव प्रथमच आल्याचे सांगत पाटील यांच्या कामाबद्दल प्रशंसा केली. यावेळी शंकर शेळके, शिवाजीराव ससे, महादेव पाटील, प्रकाश पाटील, संदीप पाटील, शैलजा पाटील, धनवंत डाफळे, नीलेश साळोखे, हेमंत घाग, प्रशांत बरणे, निखील जाधव, दिलीप सावंत, शुभम सासने, शिरीष जाधव, मालती जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)