वारणा दूध संघाची शुक्रवारी ऑनलाईन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST2021-09-16T04:31:21+5:302021-09-16T04:31:21+5:30

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर, शासनाने दिलेल्या आदेशानुसार वारणा शिक्षण संकुलातील विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्राच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने ५३ ...

Warna Dudh Sangh's online meeting on Friday | वारणा दूध संघाची शुक्रवारी ऑनलाईन सभा

वारणा दूध संघाची शुक्रवारी ऑनलाईन सभा

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर, शासनाने दिलेल्या आदेशानुसार वारणा शिक्षण संकुलातील विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्राच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने ५३ वी सर्वसाधारण सभा संपन्न होणार आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियम-अटींचे पालन करण्यात येणार असून, संघाच्या सभासदांसाठी ऑनलाईन सभा पाहणेची व्यवस्था कार्यक्षेत्रातील बहुतांशी गावामध्ये सेंटरवर करण्यात आली आहे

संघाच्या ऑनलाईन सभेच्या लिंकवरून संघाच्या सभासदांनी शुक्रवारी दुपारी २ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेस ऑनलाईन हजर राहण्याकरिता झूम मिटिंग लिंक https://bit.ly/2WXnuwL किंवा यू ट्यूब लिंक https://youtu.be/jm6ldCZj1v0 ही आहे. याची सभासदांनी नोंद घेऊन सभेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौन्ट्स विभागप्रमुख सुधीर कामेरीकर आदी उपस्थित होते.

Web Title: Warna Dudh Sangh's online meeting on Friday