शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागातील गल्ल्या, कॉलनी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST

कदमवाडी : कोल्हापूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असून, प्रभागातील नावे गायब झाली आहेत. ...

कदमवाडी : कोल्हापूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असून, प्रभागातील नावे गायब झाली आहेत. काही प्रभागांत पूर्ण गल्ली, काॅलनी गायब झाल्याचे प्रकार घडले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या यादीत संलग्नता नसून त्यामध्ये अनेक प्रकारचे घोळ असल्याने अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत, तर काही प्रभागांतील पूर्ण गल्ली, काॅलनीच दुसऱ्या प्रभागात गेली आहे. याद्यांमधील घोळामुळे आपल्या प्रभागातील नगरसेवकांना निवडण्याऐवजी दुसऱ्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याची वेळ काही मतदारांवर येणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीवेळी आमची नावे आमच्या प्रभागात असताना व आम्ही कोणताही बदल न करता आमची नावे दुसऱ्या प्रभागात गेली कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील प्रभागाची सुरुवात जिथे होते त्यातील प्रभाग ६ मधील हॉकी मैदानाच्या पाठीमागील भाग यादीतून गायब झाला असून याच प्रभागातील अष्टेकरनगरमधील १५३ पैकी केवळ ७-८ मतदारांची नावे असून उर्वरित मतदारांची नावे शेजारील प्रभाग २ व ४च्या यादीत गेली आहेत, तर प्रभाग ९ मधील काटे मळा आदी परिसरातील ४०० नावे गायब झाली असून प्रभाग २० मधील ४०० ते ५०० मतदारांची नावे प्रभाग १८, १९, २२ व ६४ या प्रभागात गेली आहेत. काही प्रभागातील मतदार मृत होऊन १०-१२ वर्षे झाली तरी त्यांची नावे मतदार यादीत दिसत आहेत. काही ठिकाणी दुबार नावे झाली असून महिला मतदारासमोर पुरुष मतदाराचा फोटो, तर काही ठिकाणी एका नावासमोर दुसऱ्याचा फोटो असा घोळ झाला आहे.

पूर्ण नगरच दुसऱ्या प्रभागात

प्रभाग ६ मधील झूम प्रकल्पाशेजारील अष्टेकरनगर हे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग ६ मध्ये होते. या पूर्णनगरातील १५०-१६० मतदारांची नावे प्रभाग २ व ४ मध्ये नोंद झाली आहेत. पोलीस लाईन प्रभाग हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते पितळी गणपती, धैर्यप्रसाद ते सर्किट हाऊस, झूम प्रकल्पाची पूर्व बाजू ते हाॅकी मैदान, पद्मा पथक ते त्र्यंबोली काॅर्नर असा मूळ प्रभाग आहे. प्रारूप यादीत हा प्रभाग केव्हीझ पार्क, डायना पार्क, वारणा काॅलनी, जि. प. रोड ते विशाळगड कंपाऊंड हा नसणारा भाग या प्रभागात दाखवत आहे. प्रभागात वाढ, पण मतदार कमी. प्रभाग ६ हा २०१५ मध्ये ५१५२ मतदानाचा मतदारसंघ होता, पण तो आता ४५३१ चा झाला. यातील ६३१ मते कमी झाली आहेत. मग प्रभाग वाढला तर मतदार कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभाग क्रमांक २० मध्ये २०१५ ला ६४०० मतदार होते. हा प्रभाग आता ४९८१चा झाला आहे.

कोट : पालिकेने प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये संलग्नता दिसत नसून एका घरातील चार माणसे चार प्रभागांत विभागली गेली आहेत. प्रभाग वाढला असूनदेखील मतदान कमी कसे ही उघड्या डोळ्यांनी दिसणारी चूक आहे. चंद्रकांत घाटगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष महानगर.