शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

'मंगेश'च्या मदतीसाठी धावले वालावलकर हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 13:23 IST

Hospital Kolhapur: वर्षभरापूर्वी हरळी (ता. गडहिंग्लज) जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात पाठीचा मणका मोडलेल्या मंगेश गुरव या तरुणाच्या मदतीसाठी कोकणातील डेरवण-सावर्डे येथील वालावलकर हे हॉस्पिटल धावून आले आहे.

ठळक मुद्दे'मंगेश'च्या मदतीसाठी धावले वालावलकर हॉस्पिटल'लोकमत'ने मांडली होती मंगेशची कहाणी

नेसरी : वर्षभरापूर्वी हरळी (ता. गडहिंग्लज) जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात पाठीचा मणका मोडलेल्या मंगेश गुरव या तरुणाच्या मदतीसाठी कोकणातील डेरवण-सावर्डे येथील वालावलकर हे हॉस्पिटल धावून आले आहे.

मुंबई येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ८ लाख रुपये खर्च येणार होता. ती शस्त्रक्रिया आता वालावलकर हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात होणार आहे. त्यांच्या या मदतीमुळे पीडित मंगेशच्या सामान्य जीवन जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 'लोकमत'ने २७ मार्च रोजी 'बिद्रेवाडीच्या गुरवला हवी मदत' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून, वर्षभर अंथरुणावर पडून असलेल्या गरीब मंगेशच्या, अपघातामुळे झालेल्या परिस्थितीची व्यथा मांडली होती.

कोकणातील प्रसिद्ध व सेवाभाव जपलेले वालावलकर हॉस्पिटलच्या ट्रस्टींनी याची दखल घेऊन या गरीब तरुणाची शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार दवाखान्याचे त्याचे मागील सर्व रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी होकार कळविला.

कोगनोळी येथील सेवाभावी कार्यकर्ते सुनील आबदागिरी व नेसरी येथील गुलाबराव पाटील व रवींद्र हिडदुगी यांच्या प्रयत्नातून डेरवण येथे नुकताच तो अ‍ॅडमिट झाला आहे. तेथे त्याच्या सर्व प्राथमिक चाचण्या घेतल्या जात असून लवकरच त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. राज्यातील नामवंत व प्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया होणार आहे.

आता शस्त्रक्रियेसाठीचा प्रश्न जरी मिटला असला तरी, औषधे व उर्वरित खर्चासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्य समितीने केले आहे.

 एस. एस.च्या माजी विद्यार्थ्यांनी दिली मदत 'लोकमत'मधील मंगेशच्या हलाकीची बातमी वाचून एस. एस. हायस्कूल नेसरीच्या १९९० च्या दहावीच्या वर्गमित्रांनी ११ हजाराची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. संतोष नौकुडकर, दिलीप पाटील, उमेश दळवी, बाळू वांजोळे आदींनी ही मदतीची रक्कम सुपूर्द केली.

मदतीचा ओघ सुरू

येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल देसाई यांनी २ हजार, तर बापूसाहेब घवाळे यांनी ५ हजारांची मदत दिली. ही सर्व मदत मंगेशच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.मंगेशचा कमरेखालचा भाग लुळा पडला असून त्याला पुन्हा उभारी येण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर