नंदगावात भैरवनाथ ग्रामविकासचा विजय (आडनाव ....चौगले की चौगुले तपासून घ्यावे )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:53+5:302021-01-20T04:25:53+5:30

नंदगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीची एकतर्फी सत्ता नरके - चौगुले गटाच्या भैरवनाथ ग्राम विकास आघाडीच्या हाती राहिली असून, ...

Victory of Bhairavnath Gram Vikas in Nandgaon (Last name .... | नंदगावात भैरवनाथ ग्रामविकासचा विजय (आडनाव ....चौगले की चौगुले तपासून घ्यावे )

नंदगावात भैरवनाथ ग्रामविकासचा विजय (आडनाव ....चौगले की चौगुले तपासून घ्यावे )

नंदगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीची एकतर्फी सत्ता नरके - चौगुले गटाच्या भैरवनाथ ग्राम विकास आघाडीच्या हाती राहिली असून, विरोधी रेणुका भैरवनाथ महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवार पराभूत झाले.

जिल्हास्तर, तालुकास्तर व साखर कारखान्याच्या माध्यमातून सत्तेवर असणारे प्रमुख स्थानिक नेते मंडळी एकमेकांच्या विरोधात ठाकल्याने निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली होती. यामध्ये ११ पैकी सर्व ११ जागा जिंकत चौगुले - नरके गटाने आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

गेली चाळीस ते पन्नास वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत चौगुले व नरके गट परस्परांचे कट्टर विरोधक म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत; पण यंदाच्या या ग्रामपंचायत निवडणुकीत हे दोन मातब्बर गट एकत्रित आल्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलली गेली होती दोन गटांनी मिळून सत्तेची सूत्रे हातात ठेवण्यासाठी व्यूहरचना केली होती, तर यांच्या विरोधात झांबरे गट, दिंडोर्ले गट, साठे गट, व डी. आर. पाटील गट या चार गटांनी एकत्रित येऊन चौगुले - नरके गटाचे ग्रामपंचायतीतील राजकीय वर्चस्व कमी करून ग्रामपंचायत ताब्यात घ्यायची या इराद्याने मैदानात उतरले होते. नरके गटाच्या वतीने शाहू संचालक मारुती निगवे, जयवंत नरके, माजी जि. प. सदस्य अनिल ढवण, कृष्णात चव्हाण, शाबाजी कुराडे, भगवान नरके, सिकंदर मुजावर, पांडुरंग नरके, विजय नलवडे, बाळासाहेब चौगुले यांनी नेतृत्व केले.

चौगुले गटाचे शाहू साखर माजी संचालक एम. आय. चौगुले, पं. स. सदस्य रमेश चौगुले, भीमराव चौगुले, शामराव शिंदे, दत्तात्रय साठे, अमर चौगुले यांनी नेतृत्व केले.

Web Title: Victory of Bhairavnath Gram Vikas in Nandgaon (Last name ....