शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:06 IST

Vaishnavi Hagawane Death Case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी मोक्का लावण्याकरीता ते नियमात बसते का पाहावे लागेल असं सांगितले.

Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच अटक केली होती. पण सासरा आणि दीर फरार होते. दरम्यान, फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी पहाटे अटक केली. या प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीएम फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज सकाळीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण तडीस जाईपर्यंत जे काही करता येईल त्या गोष्टी पोलिस करतील.

वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....

"अशा प्रकारे आत्महत्येला प्रवृत्त करणं अशा गोष्टी सहन करणार नाही. कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती केली जाईल. मकोका लावण्याकरता त्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर मकोका लागू शकेल. पण, नियमात बसेल की नाही हे आज सांगू शकत नाही, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याप्रकरणी अजित पवार गंभीर आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २१ व्या शतकातही मुली आणि सुनांमध्ये फरक करणे फार चुकीचे आहे.  त्यांना अशा प्रकारची वागणूक देणे हे पाप आहे. याप्रकरणी अजित पवार गंभीर नाहीत असे नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की, कोणी जर बोलवलं तर आपण जातो, पण पुढे काय घडणार याची कल्पना नसते एवढा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर