शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा अपूर्व सोहळा

By admin | Updated: December 6, 2014 00:26 IST

‘दिगंबराऽ. . . दिगंबराऽऽ’...चा गजर : राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी हजेरी

नृसिंहवाडी : श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड दत्तनामाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमली. ‘दिगंबराऽ. . . दिगंबराऽऽ’...च्या व ‘श्री गुरुदेव दत्तऽ...’च्या गजरात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज, दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे चार वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींचा पंचामृत अभिषेक घालून पूजा केली. दुपारी साडेबाराला श्रींचे चरणकमलावर महापूजा झाली. महापूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तीन वाजता येथील ब्रह्मवृंदाच्यावतीने पवमान पंचसुक्तांचे पठण करण्यात आले. साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी मंदिरातून वाजत-गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. पाच वाजता धार्मिक वातावरणात असंख्य भाविक व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत विधिवत दत्त जन्मकाळ सोहळा पार पडला. जन्मकाळासाठी चांदीचा पाळणा विविध रंगांच्या फुलांनी सजविण्यात आला होता. भक्तांनी पाळण्यावर अबीर, गुलाल व फुलांची मुक्त हस्ते उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपरिक पाळणा गीते व आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली. रात्री दहानंतर दत्त मंदिरात धूप, दीप, आरती व पालखी सोहळा पार पडला. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, आदी राज्यांतून अनेक भक्तगण आले होते. कर्नाटकातील बोरगाव, उगार तसेच सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, आदी भागांतून हजारो भक्त व महिला पहाटेच्या थंडीतही चालत आले होते. दरम्यान, भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतीच्यावतीने नेटके संयोजन करण्यात आले होते. नेटके संयोजनदत्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना व्यवस्थितरीत्या दत्त दर्शन झाल्याने दत्त देव संस्थानचे विश्वस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस खाते, स्वयंसेवक, कर्मचारी, आदींच्या सहकार्याने श्री दत्त जयंती सोहळा उत्तमरीत्या पार पडल्याचा विश्वास देवस्थानचे अध्यक्ष संजय पुजारी, सचिव सोमनाथ पुजारी, सरपंच राजश्री कांबळे व उपसरपंच अरुंधती पुजारी यांनी व्यक्त केला.जोतिबावर दत्त जयंती जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर आज, शुक्रवारी श्री दत्त जन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्याहवाचन, होमशांती, महापूजा, भजन, आदी कार्यक्रम झाले. श्री जोतिबा मंदिर परिसरात असणाऱ्या श्री दत्त मंदिरात आज सकाळी श्री दत्त मूर्तीस रुद्राभिषेक घालण्यात आला.