शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

कारच्या धडकेत निगवे दुमाला येथील दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 6:38 PM

कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर आंबेवाडीजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सहदेव पांडुरंग जासूद (वय ५१, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री झाला.

ठळक मुद्देकारच्या धडकेत निगवे दुमाला येथील दुचाकीस्वार ठारआंबेवाडीजवळील घटना : कारचालकावर गुन्हा

कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर आंबेवाडीजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सहदेव पांडुरंग जासूद (वय ५१, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री झाला.पोलिसांनी सांगितले, सहदेव जासूद हे कामानिमित्त कोल्हापूरला आले होते. मंगळवारी रात्री ते आपल्या दुचाकी (एमएच ०९ एएस ७१५) वरून निगवे दुमाला गावी चालले होते. आंबेवाडी गावच्या हद्दीमध्ये येताच पन्हाळ्याकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या कार (एमएच १२ ईयू ५६७)ने समोरून त्यांना धडक दिली. त्यामध्ये डोक्याला, दोन्ही पायांना, हाताला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले.

या मार्गावरील वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेत त्यांना सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कारचालक न थांबता पळून गेला. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजवरून त्याच्या कारचा नंबर पोलिसांनी मिळविला.

अपघातामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती नातेवाईक,मित्रपरिवारास मिळताच त्यांनी सीपीआर रुग्णालयात गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातेवाईक असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर