शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मटका व्यवसायिक सलीम मुल्लाच्या दोन मंडळाच्या इमारती तोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 13:59 IST

कुख्यात मटका व्यवसायिक सलीम मुल्ला याच्या आश्रयाने यादवनगर येथे उभारलेल्या दोन मंडळाच्या आरसीसी इमारती महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरश: पिटाळून लावले.

ठळक मुद्देमटका व्यवसायिक सलीम मुल्लाच्या दोन मंडळाच्या इमारती तोडल्यामहापालिकेची पोलिस बंदोबस्तात कारवाई

कोल्हापूर : कुख्यात मटका व्यवसायिक सलीम मुल्ला याच्या आश्रयाने यादवनगर येथे उभारलेल्या दोन मंडळाच्या आरसीसी इमारती महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरश: पिटाळून लावले.प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षिका ऐश्वर्या शर्मा या मटका व्यवसायिक सलीम मुल्ला  याच्या घरावर छापा टाकायला गेल्या असता त्यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिस खात्याने मनावर घेऊन मुल्ला याचे कंबरडे मोडण्यास सुरवात केली आहे. सलीम व व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करुन दोघांना कारागृहात डांबल्यानंतर आता  यादवनगरातील त्याचे घर तसेच दोन मंडळाच्या इमारती ‘रडार’ वर आल्या होत्या.शहर पोलिस उपाधीक्षिका प्रेरणा कट्टे यांनी सलीम मुल्ला याचा आश्रय लाभलेल्या इंडियन ग्रुप व शिवशक्ती मंडळाच्या इमारती विरोधात थेट महापालिकेकडे तक्रार केली होती. दोन्ही मंडळांनी बांधलेल्या आरसीसी इमारती सार्वजनिक रस्त्यावर विना परवाना बांधल्या होत्या. या इमारतीत गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंदे चालत होते.

राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडून दोन्ही मंडळांच्या इमारतींची पाहणी करण्यात आली. महापालिकेच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करुन बांधल्याचे तसेच त्यास कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पाहणीत आढळून आले. मंगळवारी राजारामपुरी विभागीय कार्यालयातर्फे सदरचे बांधकाम चोवीस तासात बांधकाम उतरुन घ्यावे म्हणून नोटीस बजावली होती. बुधवारी सायंकाळी त्याची मुदत संपली. त्यामुळे गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष कारवाई सुरु करण्यात आली.उपशहर अभियंता आर. के. जाधव, शाखा अभियंता मिलिंद जाधव, पद्मल पाटील, अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख पंडीत पोवार यांच्यासह महापालिकेचे दोन जेसीबी, दोन डंपर, चाळीस कर्मचारी असा फौजफाटा यादवनगर येथे पोहचला. पोलिस उपाधीक्षिका कट्टे, राजारामपुरी पोलिस निरीक्षक नवनाथ घुगरे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा दाखल होताच महापालिका कर्मचाऱ्यांनी इमारती तोडण्यास सुरवात केली. सुमारे दीड तासात दोन्ही इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या. कोल्हापूरातील यादवनगर परिसरातील दोन मंडळाच्या बेकायदेशीर इमारती महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने गुरुवारी जेसीबीच्या सहायाने जमीनदोस्त केल्या. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर