शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेतील जेव्हा डिझेलच संपते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:52 IST

hospital ambualnace kolhapur- कोणत्याही रुग्णाच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेचा मागील दोन दिवसांत आजरा तालुक्यातील एका कोविड रुग्णाला विचित्र अनुभव आला. दोन्ही रुग्णवाहिकेतील डिझेल संपल्याने चालकाला कॅन घेऊन पंपावर जावे लागले व तोपर्यंत रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकांची मात्र अस्वस्थता वाढली.

ठळक मुद्दे१०८ रुग्णवाहिकेतील जेव्हा डिझेलच संपते, सलग दोनदा अनुभव रुग्णांच्या नातेवाईकांच्या अस्वस्थेत पडली भर

कोल्हापूर : कोणत्याही रुग्णाच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेचा मागील दोन दिवसांत आजरा तालुक्यातील एका कोविड रुग्णाला विचित्र अनुभव आला. दोन्ही रुग्णवाहिकेतील डिझेल संपल्याने चालकाला कॅन घेऊन पंपावर जावे लागले व तोपर्यंत रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकांची मात्र अस्वस्थता वाढली.घडले ते असे : परवाच्या रविवारी (दि १४) आजरा ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी एका रुग्णास गडहिंग्लजला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. रुग्णाच्या नातेवाईकांनी १०८ नंबरला कळविल्यावर तातडीने रुग्णवाहिका आली. पेशंटला त्यात घेतल्यानंतर फर्लांगभर अंतरावर गेल्यावर ती बंदच पडली. गाडीतील इंधन मीटरचा काटा गाडीची टाकी फुल्ल असल्याचे दर्शवत होता. प्रत्यक्षात डिझेल संपले होते. मग चालक रुग्णांच्या नातेवाईकांसोबत जावून कॅनमधून डिझेल घेऊन आला व मगच रुग्ण पुढे मार्गस्थ झाला.दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. १५) उपजिल्हा रुग्णालयाने रुग्णास सीपीआरला हलविण्याची सूचना केली. पुन्हा १०८ ला कळविल्यावर तातडीने रुग्णवाहिका आली परंतु कोगनोळी चेकपोस्टच्या पुढे आल्यावर गाडी रस्त्यातच बंद पडली. त्यावेळीही गाडीतील डिझेल संपले होते. चालकाने दुसरी रुग्णवाहिका बोलावून घेतली व त्यातून जाऊन डिझेल आणल्यानंतरच गाडी कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली.

या सगळ्या प्रकारात तासभराहून जास्त वेळ झाला. त्यामुळे कोगनोळीहून सुटल्यावर वाहकाने गाडी एवढ्या जोरात सोडली की गतिरोधकावरून जाताना जोरात आदळली व त्या धक्क्याने रुग्णासह स्ट्रेचरही मागील दरवाजा तोडून बाहेर जाताजाता वाचले. सुदैवाने या विलंबाचा रुग्णाच्या प्रकृतीवर फारसा परिणाम झाला नाही परंतु हेच एखाद्या अपघातग्रस्त रुग्णाच्या बाबतीत घडले असते तर...

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर