शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद मुख्यालयातील तब्बल ८० जणांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील तब्बल ८० कर्मचाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण सभेमध्ये तातडीने स्थानांतरणाच्या बदल्याची ग्वाही दिल्यानंतर ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील तब्बल ८० कर्मचाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण सभेमध्ये तातडीने स्थानांतरणाच्या बदल्याची ग्वाही दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रात्रीच बदल्यांच्या आदेशांवर सह्या केल्या. सकाळी जिल्हा परिषदेत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात बदल्यांचे आदेश मिळाले. सात, आठ वर्षे एकाच पदावर आणि एकाच विभागात ठिय्या मारलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

गेले काही दिवस स्थानांतरणाच्या बदल्यांचा विषय जिल्हा परिषदेत चर्चेत होता. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बदल्यांवरूनच वातावरण तापले होते. तेव्हा स्थानांतरणाच्या बदल्यांना विलंब का, अशी विचारणा सदस्यांनी केली होती. तेव्हाच लवकरात लवकर या बदल्या करण्याची ग्वाही संजयसिंह चव्हाण यांनी दिली होती. त्यानुसार चव्हाण यांनी मंगळवारी रात्रीच सामान्य प्रशासन विभागाकडून बदल्यांसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी मागवून घेतली. रात्री उशिरापर्यंत निर्णय घेऊन सकाळी आठ वाजल्यापासून सर्व ९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. सकाळी हे कर्मचारी जिल्हा परिषदेत आल्यानंतर त्यांना बदल्यांचे आदेश हातात देण्यात आले. ९९ पैकी १८ कर्मचारी हे १२ तालुक्यातून मुख्यालयात आले आहेत. ९९ पैकी १९ कर्मचारी हे वित्त विभागातील असून सामान्य प्रशासनातील ८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

चौकट

दिवसभर बदल्यांचीच चर्चा

बुधवारी दिवसभर या बदल्यांचीच चर्चा सुरू होती. कोण कोणत्या विभागात गेला, मला हा विभाग पाहिजे होता, तुला तो कसा मिळाला अशी चर्चा सुरू असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत पाहावयास मिळाले.