शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मागणीवर प्रशिक्षण संस्थेचा उतारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:15 IST

शासनाचा प्रस्ताव : मराठा तरुणांसाठी ‘बार्टी’च्या धर्तीवर संस्था सरकार लवकरच करणार घोषणा

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय न्यायालयावर सोपवून, या समाजातील युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या धर्तीवर संस्था स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली असून, लवकरच या संस्थेची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. आज स्पर्धा परीक्षेपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंत अनेक ठिकाणी मराठा समाजातील तरुणांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. अगदी मुलाखत कशी द्यावी, इथंपासून ते संशोधनाच्या विविध विभागांमध्ये मराठी मुले मागे पडतात. इंग्रजीमध्ये बोलणे, लेखन या सर्वच बाबतींत नेहमीपेक्षा वेगळ्या प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. असे व्यावसायिक प्रशिक्षण बाहेर घ्यायचे झाल्यास त्याचा खर्चही मोठा आहे. काय आहे नेमकी ‘बार्टी’ संस्था च्डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आणि याबाबत अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे, यासाठी १९७८ साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’ची मुंबईत स्थापना करण्यात आली. च्नंतर ही संस्था पुण्यात स्थलांतरित करण्यात आली. २००८ साली या संस्थेचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले. याच वर्षी ही संस्था स्वायत्त झाली; तर २०१२ साली येथे २६७ पदांना मान्यता मिळाली. च्कौशल्य विकास, संशोधन, मूल्यमापन, प्रशिक्षण, युवा नेतृत्व, समतादूत अशा विविध योजनांची सुरुवात करण्यात आली. या सर्व योजना अनुसूचित जाती-जमातींसाठी आहेत. २०१२ च्या निर्णयानुसार या संस्थेच्या महासंचालकांची जात पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक म्हणून घोषणा करण्यात आली. च्‘बार्टी’ला शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असून, त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, विविध शिष्यवृत्ती देण्यात येतात. राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्यावे छत्रपती शाहू महाराजांच्या नावे किमान कौशल्य विकास, उद्योग व नोकरी यासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी, ही मागणी कोल्हापूर येथील मराठा क्रांती मूक मोर्चाने केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात याचा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला आहे. याबाबत शासनाने आधीच तयारी केली असून, लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या संस्थेला शाहू महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. कौशल्यपूर्ण प्रशिक्षण च् या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने अनुसूचित जातिजमातींसाठी असलेल्या ‘बार्टी’च्या धर्तीवर अशा प्रकारची प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. च्या माध्यमातून विविध कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार असून, या युवक-युवतींनी रोजगाराभिमुख शैक्षणिक विविध कौशल्ये आत्मसात करावीत आणि अर्थार्जनासाठी या कौशल्यांचा वापर करावा, अशी त्यामागील भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.