शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तीन टोल नाके उभारण्याचा घाट

By admin | Updated: September 2, 2015 23:27 IST

सांगली-कोल्हापूर रस्ता : एकाच ठिकाणी टोल बसविण्याची आंदोलन अंकुशची मागणी

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्याचे ५० टक्केही काम झाले नसताना सुप्रीम कंपनीकडून टोल उभारण्याची गडबड सुरू झाली आहे. तसेच एकाच ठिकाणी टोल बुथ उभा करण्याचा करार केला असला, तरी तीन ठिकाणी टोल उभारण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय कंपनीला पूर्णत्वाचा दाखला दऊ नये. तसेच टोल वसुलीचा कालावधी कमी करण्यात यावा व करारानुसारच टोल बसविण्यात यावा, अशी मागणी आंदोलन अंकुश संस्थेच्यावतीने निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वावर २०१० मध्ये सुप्रीम कंपनीला देण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनी या कंपनीने काम सुरू केले. रस्त्याचे काम पाच विभागांत सुरू असून, शिरोली ते बसवान खिंड चौपदरीकरण, अंकली ते सांगली चौकपदरीकरण, बसवान खिंड ते जैनापूरमार्गे अंकली दुपदरी व बसवानखिंड ते जयसिंंगपूरमार्गे अंकली दुपदरी, असे काम सुरू आहे. मात्र, आजअखेर ५० टक्केही काम झालेले नाही. मार्गावर २०० मी, ५०० मी, रस्त्याची लांबी दर्शविणारे किलोमीटर स्टोन बसविण्यात आले नाहीत. महामार्ग चौपदरीकरणात अडीच हजार झाडांची कत्तल झाली असताना सुप्रीम कंपनी मात्र महामार्गावर वृक्षारोपण करणार नसल्याचे समजते.अंदाज पत्रकातील सर्व परिच्छेदांत सर्व काम पूर्ण केल्यानंतर मक्तेदाराने कामात गुंतविलेल्या रकमेचा परतावा म्हणून टोलरूपाने ३० वर्षे वसूल करण्याचा करार आहे. मात्र, २०१० सालच्या रस्त्यावरील पीसीओ वरून ३० वर्षांचा करार करण्यात आलेला असून, टोल वसुलीची मुदत कमी करावी लागणार आहे, अन्यथा सामान्य नागरिकांच्या माथ्यावर हे टोलचे भूत बसणार आहे. कंपनीला टोल वसुलीसाठी करारानुसार बसवानखिंड येथे एकाच ठिकाणी टोल वसुली करण्याची तरतूद आहे. त्यानुसारच वसुली केली जावी. तसेच शंभर टक्के काम पूर्ण झाल्याखेरीज कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आंदोलन अंकुशच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वसुलीची मुदत कमी करागेल्या पाच वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम अगदी रेंगाळत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. २०१०ला चौपदरीकरणाची निविदा काढण्यात आली. व दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, २०१२ ला रस्त्याचे काम सुरू झाले ते अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे २०१० च्या पीसीओ प्रमाणे ३० वर्षे टोलवसुलीची मुदत दिली होती. मात्र, वेळेत काम पूर्ण न झाल्याने पाच वर्षांत रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे टोल वसुलीची मुदत कमी करण्याची गरज आहे.तीन टोलनाक्यांचा घाटसार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सांगली-कोल्हापूर रस्ता चौपदरीकरणाच्या करारात एकाच ठिकाणी टोल बसविण्याची अट आहे. मात्र, सुप्रीम कंपनीकडून तीन ठिकाणी टोल बसविण्याचा घाट घातला आहे. तसेच काम अपूर्ण असताना टोल उभारल्यास जनआंदोलन उभारून त्यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. तसेच उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला.