शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘मनसे’च्या महाअधिवेशनास तीन हजार पदाधिकारी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:07 PM

महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेच्या मुंबईत होणाऱ्या महाअधिवेशनास कोल्हापूर जिल्ह्यातून तीन ते साडेतीन हजार पदाधिकारी जाणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहात झाली. गेली अनेक वर्षे गटातटांत विखुरलेली ‘मनसे’ संघटना या निमित्ताने एकत्र असल्याचा दावा, या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव होते.

ठळक मुद्दे‘मनसे’च्या महाअधिवेशनास तीन हजार पदाधिकारी जाणारकोल्हापुरातील पदाधिकारी ‘मन’से एकत्र आल्याचा दावा

कोल्हापूर : महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेच्या मुंबईत होणाऱ्या महाअधिवेशनास कोल्हापूर जिल्ह्यातून तीन ते साडेतीन हजार पदाधिकारी जाणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहात झाली. गेली अनेक वर्षे गटातटांत विखुरलेली ‘मनसे’ संघटना या निमित्ताने एकत्र असल्याचा दावा, या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव होते.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन समीकरणे आकारास येऊन शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ‘मनसे’ची भूमिका काय राहणार, याबाबत उत्सुकता आहे.‘मनसे’ची राजकीय दिशा स्पष्ट करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे महाअधिवेशन २३ जानेवारीला मुंबईत आयोजित केले आहे. महाअधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तीन हजार पदाधिकारी उपस्थित राहणार असून, पक्षप्रमुख राज ठाकरे जो आदेश देतील, त्याप्रमाणे आगामी काळात एकसंधपणे काम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, विजय करजगार, राजू जाधव, हुपरीचे नगरसेवक दौलत पाटील, वडगावचे नगरसेवक संतोष चव्हाण, अभिजित राऊत, नीलेश लाड, रणजित वरेकर, अमित पाटील, अभिजित पाटील, आदी उपस्थित होते.बारकोड पाहूनच प्रवेश‘मनसे’च्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी पदाधिकाºयांना बारकोड असलेल्या प्रवेशिका दिल्या जाणार आहेत. नोंदणीकृत प्रवेशिका पाहूनच त्यांना आत सोडले जाणार असून, त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी केले.

 

टॅग्स :MNSमनसेkolhapurकोल्हापूर