मुंबई : बँकिंग क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन आणि अपुरे भांडवल यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईतील ‘सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना मंगळवारी रद्द केला. या निर्णयामुळे बुधवारचे (१२ मे २०२६) बँकिंग कामकाज बंद झाल्यापासून या बँकेला कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.
बँकेची आर्थिक स्थिती खालावलेली असून, ती ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ आहे, असे निरीक्षण आरबीआयने नोंदवले आहे. बँकेचे कामकाज पुढे सुरू ठेवणे जनहिताच्या दृष्टीने धोक्याचे असल्याचे सांगत, सहकार आयुक्तांना बँकेवर अवसायक (लिक्विडेटर) नियुक्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
ठेवीदारांना दिलासा
बँक बंद झाली असली तरी ९८ टक्क्यांहून अधिक ठेवीदार सुरक्षित आहेत. ‘डीआयसीजीसी’ नियमानुसार, प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्याचा अधिकार आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत २६.७२ कोटी रुपयांचा परतावा आधीच करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, ग्राहकांनी अधिकृत बँकिंग व्यवहारांकडे वळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Web Summary : RBI cancelled Mumbai's Sarvodaya Co-operative Bank's license due to regulatory violations and insufficient capital. Most depositors are protected up to ₹5 lakh under DICGC rules. The bank is unable to repay depositors, and a liquidator has been appointed.
Web Summary : आरबीआई ने मुंबई के सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बैंक का लाइसेंस रद्द किया, क्योंकि बैंक नियमों का उल्लंघन कर रहा था। ज्यादातर जमाकर्ताओं का ₹5 लाख तक का पैसा डीआईसीजीसी नियमों के तहत सुरक्षित है। बैंक जमाकर्ताओं को चुकाने में असमर्थ है।