औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोबल प्लेअर’ होण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:37+5:302021-01-21T04:22:37+5:30
आमदार जाधव यांना अश्रू अनावर वडिलांनी केलेल्या खडतर परिश्रमामुळेच जाधव इंडस्ट्रीज आज उभी असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. वडिलांचा ...

औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोबल प्लेअर’ होण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार करा
आमदार जाधव यांना अश्रू अनावर
वडिलांनी केलेल्या खडतर परिश्रमामुळेच जाधव इंडस्ट्रीज आज उभी असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. वडिलांचा जीवनप्रवास, आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. उद्योजक म्हणून आम्ही अनेकदा लोकप्रतिनिधींसमोर आमचे प्रश्न मांडत होतो. पण, ते अनेकदा काही लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नव्हते. त्याचा काहीसा राग मनात होता. त्यातून निवडणूक लढविली आणि सर्वांच्या पाठबळावर आमदार झालो. या आमदारकीच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
चौकट
उद्योजकांचा गौरव
या कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक विलास चव्हाण, दिलीप चव्हाण, सुधाकर नलवडे, सूर्यकांत बुधले, नंदकुमार कल्याणकर, उद्योजक नितीन वाडीकर, अरुण घोरपडे, सचिन मेनन, मूर्तिकार सर्जेराव आणि सत्यजित निगवेकर, प्रकाश शब्बेनाव्वर यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमोद चौधरी म्हणाले...
प्रदूषण टाळण्यावर भर द्या
योग्य संधी शोधा
उत्पादनांतील आधुनिकीकरण वाढवा
संशोधन, विकासावर जोर द्या
फोटो (२००१२०२१-कोल-इंजिनिअरींग पुरस्कार ०१) : कोल्हापुरात बुधवारी प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्याहस्ते ज्येष्ठ उद्योजक वसंतलाल दलाल, उद्योजिका शारदा मोहिते यांना उद्योग श्री, तर उद्योजक प्रकाश चरणे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पंडितराव जाधव यांचा उद्योग श्री पुरस्कार त्यांच्या पत्नी प्रेमला यांनी स्वीकारला. यावेळी शेजारी उद्योजक संजय अंगडी, सचिन मेनन, बाबासाहेब कोंडेकर, नितीन वाडीकर, आमदार चंद्रकांत जाधव, उद्योजक कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, रणजित शाह, हर्षद दलाल, प्रसन्नकुमार तेरदाळकर, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२००१२०२१-कोल-इंजिनिअरींग पुरस्कार ०२) : कोल्हापुरात बुधवारी प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्याहस्ते ज्येष्ठ उद्योजक वसंतलाल दलाल, उद्योजिका शारदा मोहिते यांना उद्योग श्री, तर उद्योजक प्रकाश चरणे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पंडितराव जाधव यांचा उद्योग श्री पुरस्कार त्यांच्या पत्नी प्रेमला यांनी स्वीकारला. यावेळी शेजारी उद्योजक बाबासाहेब कोंडेकर, नितीन वाडीकर, आमदार चंद्रकांत जाधव, उद्योजक कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, रणजित शाह, हर्षद दलाल उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)