शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेसाठी २० प्रभागांत ८१ नगरसेवक होणार; प्रभागाची सीमारेषा कशा असतील...वाचा

By भीमगोंड देसाई | Updated: June 12, 2025 16:09 IST

१९ प्रभागात चार तर एका प्रभागात पाच सदस्य शक्य

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : चार सदस्यप्रभाग रचनेनुसार कोल्हापूर महापालिका निवडणूक होणार असल्याने २० प्रभाग होणार आहेत. एका प्रभागात पाच तर उर्वरित १९ प्रभागात चार सदस्य असणार आहेत. अलीकडची म्हणजे सन २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्या आणि मतदार संख्येनुसार प्रभाग रचना होणार आहे. यानुसार २० प्रभागांत ८१ नगरसेवक जातील, असे महापालिका निवडणूक प्रशासनातर्फे बुधवारी सांगण्यात आले. दरम्यान, प्रभाग रचनेची प्रकिया सुरू झाली आहे. आज, गुरुवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यासाठी बैठक घेणार आहेत.

राज्यातील ड वर्ग महापालिकेसंबंधी नगरविकास विभागाने मंगळवारी काढलेल्या आदेशानुसार महापालिकेची निवडणूक चार सदस्य प्रभाग रचनेनुसार होणार आहे. शहरात जर वीस प्रभाग झाले तर एका प्रभागात चार सदस्य वाढतील, पण एकूण नगरसेवकांची संख्या मावळत्या नगरसेवक इतकीच राहणार आहे. यावेळी एका प्रभागात सरासरी २० ते २४ हजार मतदार असतील, असे अधिकारी सांगतात. प्रत्यक्षात प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदारसंख्याही स्पष्ट होणार आहे.

प्रशासक प्रसिद्ध करणार प्रभाग रचना

प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे देणे, राज्य निवडणूक आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून मान्यता घेणे, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेणे, सुनावणीनंतर अंतिम मान्यता घेण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग रचना प्रशासक प्रसिद्ध करणार आहेत.

प्रभागाची सीमारेषा अशा असतील..

प्रभागाची सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रूळ याचा विचार प्रभाग रचनेत करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रभाग रचना करताना एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्रभागाच्या सीमेचे वर्णन करताना रस्ते, रेल्वे, नाले, नद्या, सीटी सर्व्हे असा करण्यात येणार आहे.

गुगल मॅपवरील नकाशाद्वारे

गुगल मॅपवरून प्रभागाची नकाशा तयार करण्यात येणार आहे. प्रभागाचे क्षेत्र तत्काळ लक्षात येण्यासाठी प्रभागांना अनुक्रमांकासोबतच प्रभागाचे नाव देण्यासंबंधीही विचार करण्यात येणार आहे. पण प्रभागाला नाव देणे बंधनकारक केलेेले नाही. प्रशासक नावासंबंधी निर्णय घेणार आहेत.