शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान, पत्र देऊनही फवारणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:32 IST

कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान माजले असून, या कार्यशाळेत काम करत असलेले दहाजण डेंग्यूसदृश तापाने आजारी असून, वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला याबाबत लेखी पत्र दिले असूनही अद्याप या परिसरात डास प्रतिबंधात्मक औषधांची व धूरफवारणी करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

ठळक मुद्देएसटीच्या विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान, पत्र देऊनही फवारणी नाहीआतापर्यंत दहाजणांना डेंग्यूसदृश तापाची लागण

कोल्हापूर : कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान माजले असून, या कार्यशाळेत काम करत असलेले दहाजण डेंग्यूसदृश तापाने आजारी असून, वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला याबाबत लेखी पत्र दिले असूनही अद्याप या परिसरात डास प्रतिबंधात्मक औषधांची व धूरफवारणी करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळेत बसेस दुरुस्तीचे कामकाज चालते. या परिसरालगतच राज्य परिवहन कर्मचारी, अधिकारी व इतरांची निवासस्थाने आहेत. या कार्यशाळेमध्ये सुमारे २00 कर्मचारी काम करतात.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आणि गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे या कार्यशाळेच्या परिसरात डासांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे; त्यामुळे येथे काम करणारे दहाहून अधिक कर्मचारी डेंग्यूसदृश तापाने आजारी पडले. त्यांच्यावर शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत; त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.दरम्यान, परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेच्या यंत्र अभियंता (चालन) यांनी डास प्रतिबंधात्मक औषध व धूरफवारणी करण्याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना गेल्या आठवड्यात लेखी पत्र दिले आहे; मात्र अद्यापही या विभागाने याची दखल घेतलेली नाही; त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यूkolhapurकोल्हापूरstate transportएसटी