शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीत आत्मा बंद केलाय, दोन दिवसात काम मार्गी लागेल, कोल्हापुरातील शिरोलीत स्मशानभूमीत अघोरी पूजा-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:36 IST

व्हिडिओ व्हायरल, गावात भीतीचे वातावरण

शिरोली : शिरोली गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री काही मांत्रिक आणि तांत्रिक यांनी अघोरी अशी पूजा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पूजेमध्ये बाटलीत आत्मा बंद केल्याचा दावा करण्यात आला असून, “दोन दिवसांत त्याचे रिझल्ट मिळतील” असे मांत्रिक बोलतो. अघोरी कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री काही अनोळखी लोकांनी स्मशानभूमीत तंबू ठोकून तंत्र–मंत्र सुरू केले. त्यांनी हातात लिंबू घेऊन मंत्रोच्चार केले, तीन ठिकाणी बसून जप केला आणि काही नावे घेत अघोरी पूजा केली. या दरम्यान बाटलीत काहीतरी टाकून आत्मा बंद केल्याचे दृश्यही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे आणि पोलिसांकडे तक्रार देण्याची तयारी सुरू केली आहे. स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे धार्मिक किंवा तांत्रिक कृत्य करणे बेकायदेशीर आहे.गावात सध्या चर्चेला उधाण आले असून, “आत्मा बंद करण्यासारखी कृती खरंच शक्य आहे का”, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. काही जण या घटनेला अंधश्रद्धा म्हणत आहेत, तर काहींचा विश्वास आहे की यामागे काहीतरी गूढ शक्तींचा खेळ आहे.

शिरोली स्मशानभूमीत काही तांत्रिक आणि मांत्रिकांनी जे अघोरी कृत्य केले आहे, याचा व्हिडिओ पोलिसांना देऊन ज्यांनी कोणी असे कृत्य केले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीवतीने करणार आहे. - पद्मजा करपे -सरपंच 

शिरोली गावातील स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रकार मांत्रिक करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संत समाज सुधारकांची व राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये असे प्रकार घडणे ही शोकांतिका आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. -गिरीश फोंडे, माजी राज्य युवा सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती