शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: कुठं दुरंगी..तर कुठं तिरंगी लढत; गड राखण्यासाठी नेत्यांची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:49 IST

बहुतांश ठिकाणी महायुतीतच लढती, काँग्रेसचीही मोर्चेबांधणी

कोल्हापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांशी तालुक्यात महायुतीअंतर्गत तिन्ही पक्ष एकमेकांसमोर राजकीय कुस्ती करण्यासाठी शड्डू ठोकून उभे राहिले असून आपापले बालेकिल्ले राखण्यासाठी आजी, माजी आमदारांसह नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फारच कमी ठिकाणी दुरंगी लढती असून अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. महाविकास आघाडीकडे आपल्याकडील उमेदवार जाऊ नयेत यासाठी स्वतंत्र लढणाऱ्या महायुतीचा हा डाव यशस्वी होणार की कसे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.‘करवीर’मध्ये ७ ठिकाणी तिरंगीकरवीर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी वडणगे, उचगाव, पाडळी खुर्द, शिये, पाचगाव, सडोली खालसा, शिंगणापूर या सात मतदारसंघांत तिरंगी लढत होत आहे. कळंबे तर्फ ठाणे, मुडशिंगी, निगवे खालसा, गोकुळ शिरगावमध्ये दुरंगी सामना होत असून, ‘सांगरूळ’मध्ये मात्र चौरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेच्या १२ जागांसाठी ४५ ते पंचायत समितीच्या २४ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विविध मतदारसंघांत काँग्रेसबरोबरच , राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप, शिंदेसेनेचेही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसून येते. संपूर्ण तालुकाभर एकच राजकीय चित्र दिसून येत नाही.

हातकणंगलेमध्ये ११ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणातजिल्हा परिषदेच्या ११ जागा असलेल्या हातकणंगले तालुक्यात ४१ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीसाठी ९० उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे २२ जागांसाठी ७४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे तालुक्यातील चित्र असले तरी कुंभोज गटात ‘जनसुराज्य’नेही आपला उमेदवार दिला आहे.कागलमध्ये स्वाभिमानी, माकप शिंदेसेनेसोबतकागल तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपच्या युतीविरोधात शिंदेसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माकप एकत्रित येऊन लढा देणार आहेत. या ठिकाणी महायुतीमध्ये शिंदेसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांना वगळून हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजित घाटगे एकत्र आले आहेत.

गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ यांच्यासमोर भाजपचे आव्हानगडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी अर्ज दाखल केलेल्या ५४ पैकी ३४ उमेदवारांनी माघार घेतली असून २० उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या १० जागांसाठी अर्ज दाखल केलेल्या १०७ पैकी ६७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी नूलमध्ये चौरंगी, नेसरीत चौरंगी, गिजवणेत तिरंगी, भडगावमध्ये दुरंगी तर हलकर्णीत पंचरंगी सामना होत आहे.शिरोळमध्ये माघारीवरून धक्काबुक्कीशिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी २४ तर पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीविरुद्ध राजर्षी शाहू विकास आघाडी अशी लढत होत असली तरी भाजप चार जि. प. व सात पं.स. जागा लढवित आहे. अर्ज माघारीवरून निवडणूक कार्यालयाजवळच धक्काबुक्कीचा प्रकार मंगळवारी घडला.

भुदरगडमध्ये जिल्हा परिषदेसाठी ४३ जणांची माघारभुदरगड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी १०, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तालुक्यातील गारगोटी,पिंपळगाव, आकुर्डे, कडगाव या चार जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ५३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ४३ जणांनी माघार घेतल्याने केवळ १० उमेदवार मैदानात राहिले आहेत. मोठ्या प्रमाणावर माघार करवून घेण्यात नेत्यांना यश आले आहे तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी १३६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ११३ जणांनी माघार घेतली असून २३ उमेदवार अंतिम लढतीत आहेत.राधानगरी तालुक्यात बहुरंगी लढतीराधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी २३ तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या सरवडे मतदारसंघात तिरंगी, राधानगरी व राशिवडे मतदारसंघात चौरंगी, कसबा वाळवेमध्ये पंचरंगी तर कसबा तारळेमध्ये बहुरंगी लढत होत आहे. तालुक्यात निवडणुकीच्या अगोदरपासून भाजप व शिंदेसेनेच्या युतीची जोरदार चर्चा सुरू होती मात्र ती फिस्कटली.

चंदगडमध्ये महायुतीतच धूमशानचंदगड तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी सरळ दुरंगी लढत होत असून, अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अडकूर गटात मात्र काँग्रेसने तिन्ही अर्ज ठेवत महायुतीला आव्हान देत निवडणुकीत रंगत आणली आहे. उद्धवसेना केवळ अडकूर गणातून निवडणूक मैदानात असून, शिंदेसेनेने ऐनवेळी उमेदवार दिलेला नाही.गगनबावड्यात काँग्रेस विरोधात शिंदेसेना-भाजप युतीमध्ये सामनागगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी पाच तर पंचायत समितीच्या चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेस विरोधात शिंदेसेना व भाजप महायुतीमध्ये सरळ सामना होत आहे.शाहूवाडीत राष्ट्रवादी (अजित पवार) उद्धवसेनेसोबत, भाजपही विरोधातशाहूवाडी तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी १३ उमेदवार तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात राहिले.तालुक्यात जनसुराज्यविरोधात उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र आले आहेत तर भाजपनेही विरोधात उमेदवार उभे केले आहेत.आजऱ्यात महायुतीतच संघर्षआजरा तालुक्यातील दोन गटांत महायुतीमध्येच संघर्ष असल्याचे चित्र आहे. उत्तूर गटामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), ताराराणी आघाडी आणि शिंदेसेना असा तिरंगी सामना आहे तर पेरणोली गटामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना आणि भाजप असा प्रामुख्याने तिरंगी सामना आहे.

पन्हाळ्यात जनसुराज्यविरोधात वेगवेगळे पक्षपन्हाळा तालुक्यातही एकच चित्र दिसत नसून जनसुराज्यविरोधात काही ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना लढत आहे तर कोडोलीमध्ये दोन्ही उमेदवार अपक्ष असून त्यांना विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election 2026: Multi-cornered Fights Test Leaders' Fortunes

Web Summary : Kolhapur ZP elections see multi-cornered fights. Mahayuti parties clash, testing leaders to retain their strongholds. Various alliances and strategies emerge across different talukas, making the political landscape complex and unpredictable. Results will reveal the success of independent factions against the Mahavikas Aghadi.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस