शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कडाका सोमवारपर्यंत आणखी वाढणार, तापमान कसं असणार..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:44 IST

कोकणासह मध्य महाराष्ट्रात गेले तीन दिवस दमट वातावरण

कोल्हापूर : वातावरणात सुधारणा झाल्याने पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. शुक्रवारी उणे २.८ अंशांवर पारा होता. दिवसभरात कमाल तापमान २९ अंशांपर्यंत, तर किमान तापमान १४ अंशांदरम्यान होते. सोमवारी (दि. २६) पुन्हा काही अंशी थंडी वाढण्याची शक्यता जाणवते, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी, दि. २० ते गुरुवार, दि. २२ पर्यंतच्या तीन दिवसांत थंडी कमी झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी काही अंशी ढगाळ वातावरण जाणवत होते. मात्र, आता पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशावर घड्याळ काटा दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती वर्तुळाकार चक्रीय वारा स्थिती आहे. त्याच्या शेवटच्या परिघात, बंगालच्या उपसागरातून ताशी २५-२७ किलोमीटर येणाऱ्या वेगवान आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे थंडीचा चढ-उतार जाणवत आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात गेले तीन दिवस दमट वातावरण निर्माण झाले होते. या आठवड्यात शहर आणि ग्रामीण भागात सकाळी धुक्याची शक्यता असून, दिवसभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंशांपर्यंत, तर किमान तापमान १५ ते १६ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात पहाटे गारवा जाणवेल. दुपारी सूर्यप्रकाशामुळे तापमानात थोडी वाढ होऊन थंडी आणि उबदारपणाचा मिलाफ जाणवणार आहे.

असे असेल तापमान

वार - कमाल - किमान
शनिवार - २९ - १४
रविवार - २९ - १४
सोमवार - २९ - १५
मंगळवार - ३० - १६
बुधवार - ३० - १७
गुरुवार - ३० - १६

English
हिंदी सारांश
Web Title : Cold snap intensifies until Monday; Know temperature forecast.

Web Summary : Kolhapur experiences fluctuating temperatures. Cooler weather expected until Monday, with morning fog. Temperatures will range from 29-30°C maximum to 15-17°C minimum. Expect a blend of cool mornings and warmer afternoons.