चंदगड तालुक्यातील गावांना तंटामुक्तीचे बक्षीस

By Admin | Updated: December 19, 2014 23:30 IST2014-12-19T21:40:50+5:302014-12-19T23:30:51+5:30

जाणत्या पुढाऱ्यांनी स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून गावातील तंटे गावातच मिटविल्यास...

Tantamukti prize for villages in Chandgad taluka | चंदगड तालुक्यातील गावांना तंटामुक्तीचे बक्षीस

चंदगड तालुक्यातील गावांना तंटामुक्तीचे बक्षीस

चंदगड : गावातील जाणत्या पुढाऱ्यांनी स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून गावातील तंटे गावातच मिटविल्यास नागरिकांना कोर्ट कचेरी, पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी केले.चंदगड येथील पंचायत समिती सभागृहात महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार आप्पासाहेब समिंदर होते. पोलीस निरीक्षक अंगद जाधवर यांनी प्रास्ताविक करून गावातील तंटे गावातच मिटल्यास गावातील नागरिक गुण्या-गोविंदाने वागतील.यावेळी तुडये (५ लाख), दाटे (४ लाख), शिरगाव (३ लाख), कोरज (२ लाख), मुगळी (२ लाख), बोंजुर्डी (२ लाख), हिंडगाव (२ लाख), कामेवाडी (१ लाख) यासह आठ गावांना म. गांधी तंटामुक्त पुरस्काराचे धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सदानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Tantamukti prize for villages in Chandgad taluka