शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांनंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचे टेकऑफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:12 IST

CoronaVirus, airplain, kolhapurnews कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारी मुंबई-कोल्हापूर या मार्गावरील विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. पहिल्या दिवशी ५५ जणांनी प्रवास केला. तिरूपती-कोल्हापूर मार्गावरील विमानसेवा दिवाळीनंतर सुरू होणार आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांनंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचे टेकऑफपहिल्या दिवशी ५५ जणांचा प्रवास : दिवाळीनंतर तिरूपती विमानसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारी मुंबई-कोल्हापूर या मार्गावरील विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. पहिल्या दिवशी ५५ जणांनी प्रवास केला. तिरूपती-कोल्हापूर मार्गावरील विमानसेवा दिवाळीनंतर सुरू होणार आहे.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशाअंतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर हैदराबाद-कोल्हापूर-हैदराबाद आणि हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावरील विमानसेवा सुरू झाली; पण तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सेवा सुरू झाली नव्हती. ही तांत्रिक अडचण दूर झाल्याने ट्रुजेट या कंपनीने मुंबई-कोल्हापूर मार्गावरील विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू केली.

मुंबईहून निघालेले विमान कोल्हापूरमध्ये दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचले. मुंबईहून ३० प्रवासी आले. त्यामध्ये मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे आणि त्यांच्या पत्नी नीलिमा यांचा समावेश होता. कोल्हापुरातून दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.

मुंबईला २५ प्रवासी गेले. ही विमानसेवा आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी तीन दिवस असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रवाशांसाठी फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था केली होती. या विमानातून प्रवास करणाऱ्यांनी विमानतळावर सेल्फी घेत आनंद व्यक्त केला. 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर