शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

बावडा बंधाऱ्यावर प्रायोगिक तत्वावर स्विस गेट बसविण्यात यावे : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 18:34 IST

pollution Board Metting Kolhapur :पंचगंगा नदी स्वच्छ असावी. ती अखंड प्रवाहित राहवी यासाठी नियोजन सुरु आहे. प्रदुषणाच्या अभ्यासाबाबत प्रायोगिक तत्वावर बावडा बंधाऱ्यावर लवकरच स्विस गेट बसविण्यात येईल. जेणेकरुन बंधाऱ्याच्या तळाला असलेली घाण निघुन जाण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्वावर बावडा बंधाऱ्यावर स्विस गेट बसविण्यात यावे : सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन

कोल्हापूर : पंचगंगा नदी स्वच्छ असावी. ती अखंड प्रवाहित राहवी यासाठी नियोजन सुरु आहे. प्रदुषणाच्या अभ्यासाबाबत प्रायोगिक तत्वावर बावडा बंधाऱ्यावर लवकरच स्लुईस गेट बसविण्यात येईल. जेणेकरुन बंधाऱ्याच्या तळाला असलेली घाण निघुन जाण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.पंचगंगा नदी प्रदुषणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, पंचगंगेचे प्रदुषण न होऊ देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. पंचगंगेचे प्रदुषण आटोक्यात आणण्याबाबत प्रशासनाने डीपीआर तयार करावा. तसेच पूर नियंत्रणासाठी राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेटचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत विचार सुरु असल्याचेही ते म्हणाले. प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांवर स्लुईस गेट 15 ऑक्टोबरपूर्वी कार्यान्वित करावेत जेणेकरुन नदी प्रदुषणाला आळा बसेल असे मत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी व्यक्त केले.      या बैठकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी मोरे, ग्रामीण पाणी पुरवठा (जि.प.) विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :pollutionप्रदूषणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीenvironmentपर्यावरण