शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याशी झुंजलेल्या पोलिसांना बक्षीस, जखमींना मानसिक धक्का; नेमका आला कोठून...कोल्हापूरकरांना गूढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:26 IST

जखमींच्या प्रकृतीत सुधारणा 

कोल्हापूर : स्वत:चा जीव धोक्यात घालून बिबट्याशी झुंझलेल्या पोलिसांना अधीक्षक योगेश कुमार यांनी बुधवारी (दि. १२) बक्षीस जाहीर केले. रोख रकमेसह प्रमाणपत्र देऊन लढवय्या पोलिसांचा सन्मान केला जाणार आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यातील दोघांवर अजूनही सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. कोल्हापूर शहरात बिबट्या नेमका कुठून अन् कोणत्या मार्गाने आला यांची चर्चा सुरु होती.ताराबाई पार्क परिसरात बिबट्या आल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके हे त्यांच्या अन्य चार कर्मचाऱ्यांसह तातडीने वुडलँड हॉटेल परिसरात पोहोचले. बिबट्याचा शोध घेत असतानाच त्यांच्या पथकातील कॉन्स्टेबल कृष्णात पाटील यांच्यावर बिबट्याकडून हल्ला झाला.पोलिसांनी धाडसाने बिबट्याचा हल्ला परतवून लावत त्याला लपण्यासाठी जागा शोधण्यास भाग पाडले. दरम्यान, निरीक्षक डोके यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना तातडीने माहिती देऊन बोलावून घेतले. प्रसंगावधान राखून बिबट्याला जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल निरीक्षक डोके, कॉन्स्टेबल कृष्णात पाटील यांच्यासह पाच पोलिसांना विशेष बक्षीस देण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. त्याचा अहवाल त्यांनी बुधवारी तातडीने शाहूपुरी पोलिसांकडून मागवून घेतला. लवकरच या धाडशी पोलिसांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.जखमींना मानसिक धक्काबिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले कॉन्स्टेबल पाटील, बागकाम करणारे तुकाराम सिद्धू खोंदल (रा. भोसले पार्क, कदमवाडी), बाळू अंबाजी हुंबे आणि वनकर्मचारी ओंकार काटकर या सर्वांनाच मानसिक धक्का बसला होता. या चौघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली असून, पाटील आणि खोंदल यांच्यावर अजूनही सीपीआरमध्ये उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याने डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांकडून साधनसज्जताजिल्ह्यात बिबट्यासह गवा आणि हत्तींचा उपद्रव वाढत आहे. जंगली प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना घडताच सर्वप्रथम पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागते. अशावेळी कोणती खबरदारी घ्यावी? प्राण्यांना पकडण्यासाठी किंवा हुसकावून लागण्यासाठी काय करावे? याचे प्रशिक्षण पोलिसांनाही दिले जाणार आहे तसेच प्राण्यांना पकडण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.

यांना बक्षीसपोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह हवालदार चंद्रशेखर लंबे, कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, सरदार दिंडे, इंद्रजित भोसले यांना बक्षीस मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Police Rewarded for Leopard Fight; Injured Traumatized, Origin Mysterious

Web Summary : Kolhapur police who fought a leopard were rewarded. Injured victims are recovering, but traumatized. The leopard's origin remains a mystery in Kolhapur. Police will receive training and equipment for wild animal encounters.