शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतून महापौरपदासाठी सूरमंजिरी लाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:53 IST

राष्ट्रवादीतून महापौरपदासाठी अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला. उपमहापौरपदासाठी ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा येथे आमदार सतेज पाटील यांनी काँगे्रस नगरसेवकांसमवेत बैठक घेतली. अशोक जाधव, संजय मोहिते यांना सहा-सहा महिन्यांसाठी उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला.

ठळक मुद्देराष्ट्रवादीतून महापौरपदासाठी सूरमंजिरी लाटकरशासकीय विश्रामगृह, अजिंक्यतारावरून हालचाली वेगावल्या

कोल्हापूर : राष्ट्रवादीतून महापौरपदासाठी अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला. उपमहापौरपदासाठी ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा येथे आमदार सतेज पाटील यांनी काँगे्रस नगरसेवकांसमवेत बैठक घेतली. अशोक जाधव, संजय मोहिते यांना सहा-सहा महिन्यांसाठी उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला.राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांनी महापौरपदाचा, तर काँगे्रसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठक झाली.

यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक अजित राऊत, मुरलीधर जाधव, माधवी गवंडी, सरिता मोरे, वहिदा सौदागर, आदील फरास, राजू लाटकर, सचिन पाटील, आदी उपस्थित होते. अजिंक्यतारा येथे झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सभागृह नेते दिलीप पोवार, नगरसेवक भूपाल शेटे, आदी नगरसेवक उपस्थित होते.अशी एकी कायम ठेवा : मुश्रीफमाजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांना उमेदवारी द्यावी, अशी भावना सर्व नगरसेवकांची असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व नगरसेवकांची वैयक्तिक मते घेण्याची आवश्यकता नाही. हा सर्वांचा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर आमदार हसन मुुश्रीफ यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, अशीच एकी कायम ठेवा, एक वर्षाने महापालिकेची निवडणूक असून शहरातील विकासकामे करा, अशा सूचना केल्या.अनुराधा खेडकर यांची दांडीशिक्षण समिती सभापती अनुराधा खेडकर यांनी बैठकीला दांडी मारली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे सासरे आनंदराव खेडकर यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.भाजपचे तीन सदस्य काँगे्रसच्या संपर्कातगेल्या चार वर्षांपासून भाजपला पाठिंबा दिलेले मनसेचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यासह भाजपच्या आश्विनी बारामते, संभाजी जाधव यांनी अजिंक्यतारा येथे जाऊन काँगे्रसच्या बैठकीत हजेरी लावली.महापौरपद दीड महिन्यासाठीचपुढील महापौरपद दीड महिन्यासाठीच असणार आहे. त्यानंतर पुढील वर्षासाठी हे पद काँगे्रसकडेच राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जाधव, मोहिते यांना सहा-सहा महिन्यांसाठी उपमहापौरपदकाँगे्रसला पुढील एक वर्ष उपमहापौरपद राहणार आहे. तशी ग्वाही मागील वेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सध्या काँगे्रसमधून अशोक जाधव व संजय मोहिते या पदासाठी इच्छुक आहेत. 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर