शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील विद्यार्थी लाल परीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST

मुरगूड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेले अनेक दिवस बंद असणाऱ्या बहुतांश शाळा सुरू झाल्या खऱ्या, पण तालुक्याच्या ठिकाणी ...

मुरगूड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेले अनेक दिवस बंद असणाऱ्या बहुतांश शाळा सुरू झाल्या खऱ्या, पण तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस लवकर उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. एसटी सेवा सुरू नसल्याने शाळेपर्यंत जायचे कसे, या गर्तेत विद्यार्थी आणि पालक सापडले आहेत.

दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला तरी बरेच विद्यार्थी अजून घरीच आहेत. त्यामुळे एसटीअभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी गावा-गावांत शाळा आहेत. पण माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर दूर शहरातील किंवा परिसरातील मोठ्या गावांत जावे लागते. यासाठी विद्यार्थी सुरक्षित आणि सवलतीची म्हणून शासनाच्या एसटी सेवेचा लाभ घेतात. तसेच पाचवी ते बारावीपर्यंत शासनाने सावित्रीबाई फुले मोफत पास योजना मुलींसाठी लागू केली आहे. मुलांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध करून दिला जातो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिने सर्वच शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वच गावांत, शहरात शाळा सुरू केल्या आहेत. पण अजून बऱ्याच ठिकाणी एसटी बस सुरू न केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे. गावापासून लांब असणाऱ्या शाळेत जायचे कसे, हा प्रश्न भेडसावत आहे. एसटी बस सुरू नसल्याने काही पालक आपल्या पाल्याला सोडण्यासाठी जात आहेत, तर काही ठिकाणी खासगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन मुले शाळेत येत आहेत. त्यामुळे कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील सर्वच शाळांनी एसटी सेवा सुरू करा, अशी मागणी गारगोटी व कागल एसटी डेपोकडे केली आहे. गाड्या सुरू केल्यानंतर प्रवासी बसत नाहीत, अशी तक्रार कर्मचारी करतात. मग तोट्यात गाड्या सुरू करायच्या का, असा सवाल एसटीचे स्थानिक अधिकारी करत आहेत. एसटी बस सुरू होण्यास अनेक अडथळे असले तरी त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान का? असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.