शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार ‘मोबाईल ट्युटर’

By admin | Updated: October 16, 2015 00:11 IST

शिवाजी विद्यापीठ : तंत्रज्ञान विभागाचा चेन्नईच्या एम-ट्युटरशी सामंजस्य करार

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणालीत स्मार्ट फोन, टॅबलेट्सवरही अभ्यास करता यावा, यादृष्टीने शिवाजी विद्यापीठाने चेन्नईच्या ‘एम-ट्युटर’ कंपनीसमवेत सोमवारी सामंजस्य करार केला. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विषयातील ‘मोबाईल ट्युटर’ उपलब्ध होणार आहेत.विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि एम-ट्युटर यांच्यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व ‘एम-ट्युटर’चे उपाध्यक्ष भारत सुंदरम यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘एम-ट्युटर’ ही संकल्पना विद्यार्थी, शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या केवळ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा वर्षअखेरीपर्यंत उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमास ‘एम-ट्युटर’ कंपनीचे उपाध्यक्ष शेनबाग राज आर, विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. एस. एस. कोळेकर, आर. सी. रणवीर, महेश साळुंखे, नितीन अळझेंडे, अनिल रणवीर, पी. डी. पाटील, ए. ए. मांजरेकर, एच. ए. तिरमारे, एच. पी. खंडागळे, आदी उपस्थित होते. हर्षवर्धन पंडित यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. साहू यांनी आभार मानले. कराराचा उपयोग असा...या करारानुसार बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एम-ट्युटर’ कंपनी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित अ‍ॅप तयार करणार असून, विद्यापीठाची वेबसाईट, कंपनीच्या वेबसाईटसह विद्यार्थ्यांना डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्ट फोन्स व टॅब यावर अ‍ॅप डाऊनलोड करून अभ्यास करता येणार आहे. अभ्यासक्रमातील विविध विषयांवर १५-१५ मिनिटांचे ट्युटोरिअल्स तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी आॅडिओ-व्हिज्युअल व अ‍ॅनिमेशनचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या ट्युटोरिअल्सवर आधारित असेसमेंट प्रश्नही विचारण्यात येतील. या एम-ट्युटरमुळे विद्यार्थ्यांची अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता वाढेल, असे भारत सुंदरम यांनी सांगितले.