शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीचा फायदा घेत एसटीमध्ये विद्यार्थिनींना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:31 IST

निरक्षरतेवर मात करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा पोहचावी, यासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्चून सर्व शिक्षा अभियान चालवून शिक्षणाचा समान हक्क देत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : होमगार्ड सदस्य नोंदणीला सोमवारपासून सुरुवात झाली. ३६८ पुरुष व १८६ महिला अशा एकूण ५५४ होमगार्ड जागेसाठी एक हजार उमेदवारांनी नोंदणी केली. कसबा बावडा येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सदस्य नोंदणी करण्यात आली. होमगार्ड ही मानसेवी संघटना आहे. पोलीस कवायत मैदान येथे उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व शारीरिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातून शेकडो उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. आज, मंगळवारी पहाटे पाच वाजता कसबा बावडा ते शिये रोडवर महिला व पुरुष उमेदवारांची धावण्याची परीक्षा होणार आहे. होमगार्ड विभागाचे प्रमुख दिनेश बारी, होमगार्डचे प्रभारी अधिकारी ए. एम. देवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया सुरू आहे. सण, उत्सव, मोर्चा, आंदोलन, आपत्ती निवारण, निवडणूक प्रक्रिया यावेळी पोलिसांना मदत म्हणून होमगार्डची मदत घेतली जाते. सध्या जिल्ह्यात १९०० होमगार्ड आहेत. रिक्त पदे असणाऱ्या ५५४ जागांसाठी ही सदस्य नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आठ दिवस आॅनलाईन अर्ज मागविले होते. तालुकानिहाय पदे भरून घेतली जाणार आहेत. सोमवारी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी उमेदवारांची वजन, उंची व इतर आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील बारा तालुक्यांतून उमेदवार सदस्य नोंदणीसाठी आले होते. पोलीस भरती, सैनिक व अग्निशामक विभागात भरती प्रक्रियेत होमगार्डना ५ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे तरुण व तरुणींनी होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता गर्दी केली होती. बंदोबस्तात सहभागी असलेल्या प्रत्येक होमगार्डला शासनाकडून ४०० रुपये प्रतिदिन मानधन दिले जाते. नियुक्तीनंतर तीन वर्षांत ४० टक्के बंदोबस्तात त्यांना सहभाग नोंदवावा लागतो, अन्यथा पद रद्द केले जाते. या भरती प्रक्रियेत बेरोजगार तरुणांना प्रवेश दिला जात नाही. उमेदवार ज्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय, शेती, घरगुती लघुद्योग करीत असेल तर त्याचे पत्र जोडावे लागत होते. शेतकरी तरुणांकडून सात-बारा मागणी केली जात होती. काही तरुणांनी आॅनलाईन सात-बारा जोडला होता. गतवेळी उमेदवारांनी सुशिक्षित बेरोजगार असा उल्लेख केल्यामुळे शेकडो उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर पडले होते परिणामी यावेळी अगोदर उमेदवारांना अर्ज भरताना तशा सूचना केल्यामुळे त्याचा फायदा झाला. धावण्याचीआज चाचणी पात्र उमेदवारांची आज, मंगळवारी पहाटे ५ ते सकाळी ११.३० पर्यंत कसबा बावडा ते शिये रोडवर पुरुषांसाठी १६०० व महिलांसाठी ८०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण विभागाने या मार्गावरील वाहतूक वळविली आहे. होमगार्ड विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश बारी व प्रभारी अधिकारी ए. एम. देवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी होत आहे. राज्य राखीव दलाचे १५ जवान, २० पोलीस कर्मचारी ५ महिला पोलीस असा बंदोबस्त ठेवला आहे.