शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:08 IST

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे बुधवारी सायंकाळी कुत्रे पकडणाऱ्या पथकावर कुत्र्यांनी हल्ला करून एकाला जखमी केल्यानंतर गुरुवारी (दि. ...

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे बुधवारी सायंकाळी कुत्रे पकडणाऱ्या पथकावर कुत्र्यांनी हल्ला करून एकाला जखमी केल्यानंतर गुरुवारी (दि. १८) ही मोहीम थांबविण्यात आली. तर बुधवारी रात्री टाकळीवाडी येथे म्हशीच्या रेडकूवर तर नवे दानवाड येथे एका गायीवर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तथापि शुक्रवारपासून सलग तीन दिवस कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली. दत्तवाडसह परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून जनावरांवर हल्ले सुरूच आहेत. गुरुवारी सकाळी शेताकडे जाणाऱ्या झुणके या महिलेवर कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थांनी कुत्र्यांना पिटाळून लावल्याने अनर्थ टळला.

दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य नूर काले यांनी गुरुवारी तहसीलदार अपर्णा मोरे यांना भटकी कुत्रे पकडण्याची मोहीम सुरु करण्याची मागणी केली. याप्रकरणी कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी लाला मांजरेकर, अमोल कोळी, बसगोंडा पाटील, सुरज बेनाडे यांच्यासह उपस्थित होते.

फोटो - १८०२२०२१-जेएवाय-१०

फोटो ओळ - शिरोळ येथे मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले.