शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मधाळेंच्या न्यायासाठी ‘रिपाइं’तर्फे रास्ता रोको

By admin | Updated: September 5, 2015 00:13 IST

संस्थेचे मानद सचिव चर्चेसाठी रस्त्यावर : आर्य समाज शिक्षण संस्थेसमोर कार्यकर्त्यांची निदर्शने

कोल्हापूर : निवृत्त शिक्षक जयवंत मधाळे यांचा पेन्शन प्रस्ताव वरिष्ठ वेतनश्रेणीसह मुंबईतील महालेखाकार कार्यालयाकडे पाठवावा, या मागणीसाठी तसेच हक्कांसाठी लढणाऱ्या मधाळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (ए) शुक्रवारी लक्ष्मीपुरीतील आर्य समाज शिक्षण संस्थेच्या दारात रास्ता रोको आंदोलन व निदर्शने केली.आर्य समाज एज्युकेशन सोसायटीच्या बा. कृ. पाटील-कौलवकर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक मधाळे यांचा गेल्या तीन वर्षांपासून पेन्शन, सेवापुस्तक व अन्य लाभांसाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘रिपाइं’ने हे आंदोलन केले. ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी सव्वाबाराला आंदोलनकर्ते आर्य समाज शिक्षण संस्थेच्या दारात दाखल झाले. त्यांनी ‘मधाळे सरांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘न्याय नाकारणाऱ्या संस्थेचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत रास्ता रोको केला. शिवाय चर्चेसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर येण्यास भाग पाडले. संस्थेचे मानद सचिव अनिरुद्ध पाटील येताच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. मानद सचिव पाटील यांना चर्चेसाठी रस्त्यावर बसविले. यावेळी मधाळे यांच्या प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेबाबत चर्चा झाली. प्रा. कांबळे यांनी मधाळे यांचा पेन्शन प्रस्ताव वरिष्ठ वेतनश्रेणीसह महालेखाकार कार्यालयात पाठवावा, अशी मागणी केली. त्यावर मानद सचिव पाटील यांनी पेन्शन प्रस्तावाची कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादर केली असून, मधाळे यांच्याबाबत सकारात्मक सहकार्याची भूमिका राहील, असे सांगितले. यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. आंदोलनात ‘आरपीआय’चे जिल्हा सरचिटणीस विलास भामटेकर, शहरचे सरचिटणीस सुखदेव बुध्याळकर, एस. डी. कांबळे, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, रूपाताई वायदंडे, अविनाश अंबपकर, दिलीप कोथळीकर, रोहित मधाळे, योगेश शिर्के, शामप्रसाद कांबळे, मारुती गायकवाड, अशोक गायकवाड, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)