कुंभी कासारीवर राज्यस्तरीय नरके चषक फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST2021-02-06T04:44:31+5:302021-02-06T04:44:31+5:30

कोपार्डे - कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. डी. सी. नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त खुल्या ...

State Level Hell Cup Football Tournament at Kumbhi Kasari | कुंभी कासारीवर राज्यस्तरीय नरके चषक फुटबॉल स्पर्धा

कुंभी कासारीवर राज्यस्तरीय नरके चषक फुटबॉल स्पर्धा

कोपार्डे - कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. डी. सी. नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन सांगरूळ फुटबॉल क्लबच्यावतीने करण्यात आल्याची माहिती संभाजी नाळे व शिवाजी डबल यांनी दिली.

संभाजी नाळे म्हणाले, माजी आमदार चंद्रदीप नरके व अजित नरके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील फुटबॉलला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी १० फेब्रुवारी अखेर संघांनी नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणी केलेल्या ग्रामीण भागातील पहिल्या २२ संघांना आणि शहरी भागातील पहिल्या १६ संघांना प्राधान्य दिले जाणार आहे. विजेत्या संघाला २१ हजार रुपये, उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकप्राप्त संघाला ११ हजार रुपये व भव्य डी. सी. नरके चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकप्राप्त संघाला ७ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे.

याशिवाय स्पर्धेत व्यक्तिगत कौशल्य दाखविणाऱ्या खेळाडूला ‘मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट डिफेन्स, बेस्ट गोली’ अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

Web Title: State Level Hell Cup Football Tournament at Kumbhi Kasari