शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेतीसाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST

कोल्हापूर : राज्यातील कोणत्याही पाच कृषी महाविद्यालयांची निवड करून कोरडवाहू शेतीसाठी सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करावे. शेतकऱ्यांना चांगला ...

कोल्हापूर : राज्यातील कोणत्याही पाच कृषी महाविद्यालयांची निवड करून कोरडवाहू शेतीसाठी सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करावे. शेतकऱ्यांना चांगला व्यापारी बनविण्यासाठी त्यादृष्टीने प्रशिक्षण देण्याकरिता प्रत्येक महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरू व्हावा, अशा संकल्पना नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी सोमवारी सुचविल्या. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत चर्चा केली.

दुसरी क्रांती कोरडवाहू शेती क्षेत्रात होणार आहे. त्यासाठी उच्चशिक्षण विभागाने सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करावे. कापूस, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पादनवाढीबाबत प्रशिक्षण, संशोधनाचे काम या सेंटरच्या माध्यमातून व्हावे. विद्यापीठांनी उद्योग संस्थांचा समन्वय वाढवावा. त्यांना विद्यापीठ परिसरात कारखाना, कार्यालये सुरू करण्यास मदत करावी. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन संशोधन, पीएच.डी. करता येईल. पॉलिटेक्निकमध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण, अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी सूचना डॉ. थोरात यांनी केली. विद्यार्थ्यांना चांगले इंग्रजी बोलता यावे, याकरिता प्राध्यापकांना त्याबाबत पहिल्यांदा अद्यावत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्याबाबतचा पायलट प्रोजेक्ट हा रयत शिक्षण संस्थेत मी राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमाबाबत शिक्षण विभागाने विचार करावा, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. त्यावर या संकल्पना, सूचनांबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन त्याबाबत पुन्हा एखादा आपल्याशी चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील माने, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे उपस्थित होते.

चौकट

चांगल्या शिक्षकांची पुन्हा नियुक्ती

वय वर्षे ५८ ते ६५ दरम्यानचे अनेक चांगल्या शिक्षक, प्राध्यापकांकडे ज्ञानाचा साठा आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या ज्ञानाचा वापर शिक्षण विभागाला कशा पद्धतीने करता येऊ शकेल याचा विचार व्हावा. त्यांची मानधन अथवा अन्य तत्त्वावर पुन्हा नियुक्ती करता येईल, असे डॉ. थोरात यांनी सुचविले.