स्टार ११२३... जिल्ह्यातील पावणेदोन लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत ...भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST2021-09-02T04:54:06+5:302021-09-02T04:54:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील पावणेदोन लाख नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत. परंतु अजूनही ...

Star 1123 ... Fifty two lakh citizens of the district are waiting for the second dose ... Part 1 | स्टार ११२३... जिल्ह्यातील पावणेदोन लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत ...भाग १

स्टार ११२३... जिल्ह्यातील पावणेदोन लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत ...भाग १

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील पावणेदोन लाख नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत. परंतु अजूनही त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही. ११२ दिवसांची मुदत संपण्याआधी दुसरा डोस देण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या ३ हजार ६६६ नागरिकांचीही दुसऱ्या डोसची मुदत संपली आहे.

कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. तो ११२ दिवसांच्या आत घेण्याचा निकष आहे. जून, जुलैमध्ये लस कमी प्रमाणात आल्यामुळे त्यावेळी दुसरा डोस दिला गेला नाही. त्यांना आता प्राधान्याने लस दिली जात आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत ज्यांनी पहिला डोस घेतला आता त्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनतर दुसरा डोस घ्यावा लागतो. ३ हजार ६६६ नागरिकांना दुसरा डोस मुदत संपल्यानंतरही मिळालेला नाही.

Web Title: Star 1123 ... Fifty two lakh citizens of the district are waiting for the second dose ... Part 1