शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कळेत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST

कळे : लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त 'लोकमत नातं रक्ताचं' व कोल्हापूर पोलीस दलाच्या 'मिशन संवेदना’या ...

कळे :

लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त 'लोकमत नातं रक्ताचं' व कोल्हापूर पोलीस दलाच्या 'मिशन संवेदना’या उपक्रमांतर्गत कळे (ता. पन्हाळा) येथे रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ, पोलीस पाटील संघटना व कळे परिसरातील तरुण मंडळे यांचे सहकार्य लाभले.

शिबीराचे उद‌्घाटन कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आबा रामा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील , कळेचे सरपंच सुभाष सर्जेराव पाटील, माजी उपसरपंच बाजीराव पाटील, पन्हाळा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी आनंदराव आकुर्डेकर , कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे माजी विभागीय सचिव टी.एल.मोळे, लालबावटा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव घोरपडे , गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहा.पो. नि. रणजित पाटील, पो. निरीक्षक प्रवीण शिंदे, पोलीस हवालदार अशोक निकम, पो. कॉन्स्टेबल सागर पाटील , संजय पाटील, डॉ.अजित पाटील, वाघुर्डेचे माजी सरपंच विलास दगडू कांबळे, भाजप युवा आघाडीचे अध्यक्ष प्रताप काळे, युवक कॉंग्रेसचे राकेश काळे, समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव संभाजी दांगट, धर्मराज हॉलिबॉल क्लबचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग प्रभावळे , स्पार्क हॉलिबॉल क्लबचे सतीश जाधव, आसिफ जमादार, आबा कालेकर, व्यापारी संघटनेचे सुनील डबिरे, रामचंद्र झुरे सुरेश नाईक ( वाघुर्डे ) उपस्थित होते. भार्गव भाळवणे , पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.व्ही.पाटील , विद्यमान अध्यक्ष शब्बिर मुल्ला , धनाजी गुरव , अरुण तळेकर, युवराज बोरगे, धनाजी पाटील , संग्राम पाटील, सुरेश वडर, तानाजी पाटील, सचिन सुतार, रघुनाथ मोरे , कृणकांत कांबळे, जालंदर कांबळे , नामदेव भोसले , राजू महाजन , दिलीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

चौकट -

दिव्यांग आरोग्य सेविकेसह दोन महिलांनी केले रक्तदान

कळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दिव्यांग आरोग्य सेविका मनीषा कांबळे यांनी तसेच कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा गट प्रवर्तक स्मिता कुलकर्णी यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तर प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे कार्यरत असणारे व

शिवगर्जना फाउंडेशन सातार्डे (ता पन्हाळा ) संस्थापक अध्यक्ष दिगंबर चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून येऊन रक्तदान केले.

१० कळे रक्तदान शिबिर

फोटो ओळ -

कळेतील रक्तदान शिबिर उदघाटनप्रसंगी जि.प.माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, कुंभी कासारी कारखान्याचे संचालक आबा रामा पाटील, कळेचे सरपंच सुभाष सर्जेराव पाटील, गट शिक्षणाधिकारी आनंदराव आकुर्डेकर, टी.एल. मोळे , भगवानराव घोरपडे, सहा.पो. नि. रणजित पाटील , पो.निरीक्षक प्रवीण शिंदे , पोलीस हवालदार अशोक निकम , संजय पाटील, पी.व्ही.पाटील, शब्बिर मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

छाया - लाजरी फोटो. काटेभोगाव