शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दररोज मैदानावर खेळणाऱ्या मुलांना विशेष गुण

By admin | Updated: September 20, 2015 23:54 IST

विनोद तावडे : मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी उपक्रम

सावंतवाडी : मैदानी खेळ आणि शिक्षणाची सांगड घालत विद्यार्थ्यांची नजर मोबाईलवरून हटविण्यासाठी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आठवड्याचे पाच दिवस प्रत्येकी एक तास मैदानी खेळात प्रावीण्य मिळविल्यास दहावीच्या गुणपत्रिकेत विशेष गुण देऊन दखल घेण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली, पुखराज पुरोहित, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर व पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणात मैदानी खेळांची आवड लावण्यासाठी सरकार खास योजना आखत आहे. इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी दर दिवशी एक तास मैदानात घालवला पाहिजे. आठवड्यातील पाच दिवस दरदिवशी एक तास मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिकेत विशेष गुण देण्याचा विचार आहे, असे क्रीडामंत्री विनोद तावडे म्हणाले. काँगेसने अनुदान मिळेल तेव्हा विनाअनुदानीत शाळांचा विचार करण्याचा निर्णय घेतला. पण, काही शाळांना अनुदान लाटण्यासाठीचेही निर्णय घेतले. त्यामुळे अनुदानीत व विनाअनुदानीत शाळांबाबत सरकार तारतम्य ठेवून निर्णय घेत आहेत. तसेच दहावीत चार टक्के नापास विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यांच्या कौशल्यगुणांना वाव दिला जात आहे, असेही तावडे म्हणाले. दोडामार्ग, वैभववाडी व कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप व शिवसेना युती करून लढवावी, असा विचार आहे. युतीपेक्षा तिन्ही शहरांचा दर्जेदार विकास नगरविकास खात्याकडून व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहीन. या शहरांसह जिल्ह्याचा विकास साधताना राजकीय पक्षांपलीकडे जाऊन सर्वच पक्षांच्या नेतृत्वाने गांभीर्याने विचार करावा, आदर्श व दर्जेदार शहरे बनवावीत म्हणून नगरविकास खात्याने नगरपंचायत दर्जा दिला आहे. शहरे बकाल होऊ नयेत तर विकास, शैक्षणिक दालने, पार्किंग व सांडपाणी व्यवस्थापन अशा स्तरावर योग्य नियोजन करून शहराचा विकास हेच सरकारचे धोरण आहे. यासाठी सिंधुदुर्गात विशेष प्रयत्न करून हे राबविण्यात येईल, असेही तावडे म्हणाले. (वार्ताहर)