सोनाबाई माने यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:23 IST2021-03-25T04:23:29+5:302021-03-25T04:23:29+5:30

कोल्हापूर : ममदापूर येथील सोनाबाई दामोदर माने (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, तीन मुली, सुना, ...

Sonabai Mane passed away | सोनाबाई माने यांचे निधन

सोनाबाई माने यांचे निधन

कोल्हापूर : ममदापूर येथील सोनाबाई दामोदर माने (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक महावीर माने यांच्या मातोश्री होत. जलदान विधी उद्या, शुक्रवारी मूळ गावी ममदापूर येथे होणार आहे.

बाळकृष्ण कुंभार

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील बाळकृष्ण आनंदराव कुंभार-वारनुळकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातंवडे असा परिवार आहे.

आनंदीबाई कुंभार

कोल्हापूर : बिनखांबी गणेश मंदिरजवळील आनंदीबाई पांडुरंग कुंभार यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शुक्रवारी आहे.

छाया फडणीस

कोल्हापूर : साने गुरुजी वसाहतीतील छाया सुधाकर फडणीस (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या आजरा येथील आण्णाभाऊ सूतगिरणीचे सल्लागार चंद्रशेखर फडणीस यांच्या मातोश्री होत.

Web Title: Sonabai Mane passed away