शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा प्रश्न सोडवा, मगच चौपदरीकरण

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

निमशिरगावची शाळा रामभरोसे : ग्रामस्थच करणार शाळेची डागडुजी; अवजड वाहनांना बंदी घालणार

संदीप बावचे -जयसिंगपूर -निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील प्राथमिक शाळा सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणांतर्गत जात असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पर्यायी जागेचा प्रश्न अजूनही भिजतच पडला आहे. जागा मूल्यांकनावरून प्रशासकीय पातळीवर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळेच्या जागेचा प्रश्न आता रामभरोसेच राहिला आहे. दरम्यान, लोकवर्गणीतून शाळेची डागडुजी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून, जोपर्यंत जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नाही, तसेच कोणत्याही अवजड वाहनांना रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.जिल्हा परिषदेने शाळा हस्तांतराचा दाखला दिला, नवीन जागेचा ठरावही झाला मात्र; शाळा हस्तांतरित झाल्यामुळे शाळेच्या डागडुजीचा निधीही नाही व नवीन जागाही नाही, अशी अवस्था प्राथमिक शाळेची बनली आहे. धोकादायक असलेल्या या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्यामुळे ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था शाळेची बनली आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सुमारे तीनशे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासनाला त्याचे कसलेही सोयरसुतक नाही. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने वेळोवेळी शासकीय कार्यालयामध्ये लेखी निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना धोकादायक बनलेल्या इमारतीचे पर्यायी जागेत बांधकाम करून देणे गरजेचे आहे. दरम्यान, जागेबाबतचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जिरायत जमिनीप्रमाणे साडेचार लाख, बागायत जमिनीप्रमाणे सहा लाख, तर बिगर शेतीप्रमाणे हेक्टरी २५ लाख रुपये किंमत होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने या तांत्रिक बाबी पुढे केल्याने जागेचा प्रश्न आणखीन कठीण होत चालला आहे. जागा मूल्यांकनाच्या या प्रश्नामुळे हा प्रश्न आणखी किती वर्षे भिजत पडणार, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. शाळा इमारत मोडकळीस आल्यामुळे येत्या जूनमध्ये शाळा भरवायची कोठे, हा प्रश्न गंभीर बनल्यामुळे आता ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अगदी पडण्याच्या स्थितीत असलेल्या तीन खोल्या वापरात न आणता उर्वरित खोल्यांची डागडुजी केली जाणार आहे. जोपर्यंत शाळेचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत गावातील रस्त्यांचे काम करू देणार नाही, तसेच कोणत्याही अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्याचाही पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.‘शासकीय काम, सहा महिने थांब’दोन वर्षांपूर्वी शाळेच्या नवीन इमारतीसाठी गावालगत असणाऱ्या एक हेक्टर ४२ आर. या जागेच्या मागणीचा गावसभेपुढे ठराव घेण्यात आला आहे. अद्याप शाळेला जागा मिळालेली नाही. ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासकीय पातळीवर कागदी घोडे नाचविले जात आहेत. या चालढकल प्रकारामुळे ग्रामस्थ आता आंदोलनाच्या भूमिकेत आहेत.